
नाशिकहून गोवा व बेंगळुरुसाठी थेट विमानसेवा
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककर वाट पाहत असलेल्या गोवा व बेंगळुरू या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरांशी हवाईसेवेने जोडले जाणार आहे. स्पाइस जेट कंपनीच्या वतीने सप्टेंबर व ऑक्टोबर या सीझनमध्ये ओझर विमानतळावरून दररोज सेवा राहणार आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ओझर विमानतळावरून सध्या अहमदाबाद- पुणे- हैदराबाद दिल्ली या महत्त्वाच्या शहरांमध्ये हवाई सेवा सुरू आहे आता २५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या सीझनमध्ये गोवा व बेंगळुरुसाठी हवाई सेवा सुरू होत आहे.
दुपारी साडेबारा वाजता बेंगळुरु होऊन विमानाचे उड्डाण होईल दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी ओझर तळावर विमान उतरेल. त्यानंतर दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल तीन वाजून ५५ मिनिटांनी गोव्याला पोहचेल. गोव्याहून साडेपाच वाजता विमानाचे नाशिकसाठी उड्डाण होईल. संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी ओझर विमानतळावर आगमन होईल सहा वाजून ५५ मिनिटांनी पुन्हा बेंगळुरुसाठी विमानाचे उड्डाण होईल. दोन महिन्यांसाठी विमानसेवा असली तरी स्पाइस जेट कंपनीच्या वतीने ऑक्टोबरनंतर विंटर सिझनचे नियोजन केले जाणार आहे. गोवा व बेंगळुरुसाठी निरंतर सेवा सुरू राहील. गोवा व बेंगळुरु हे दोन्ही शहरे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे, नाशिकमध्ये आयटी उद्योग यावे, यासाठी विविध संस्था व व कंपन्या इच्छुक आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी हवाई सेवा सुरू झाल्यानंतर आयटी उद्योगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाशिकच्या आयटी उद्योगाला चालना मिळण्यासाठी गोवा व बेंगळुरू हवाई सेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यानुसार आता सेवा सुरू होत आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रात देखील नाशिकची प्रगती या निमित्ताने होईल.
- मनीष रावल, अध्यक्ष, आयमा एव्हिएशन कमिटी.
Web Title: Direct Flights From Nashik To Goa And Bangalore Spicejet Udan Yojana Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..