Postal Department Recruitment : डाक विभागात जीवन विमा अभिकर्त्यांची थेट भरती; या आहेत अटी

Postal Department recruitment
Postal Department recruitmentesakal

नाशिक : नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट मुलाखतीद्वारे अभिकर्त्यांची (विमा एजंट) नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजता प्रवर डाक अधीक्षक नाशिक कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. (Direct Recruitment of Life Insurance Agents in Postal Department Nashik News)

अभिकर्ता पदासाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे

-उमेदवार दहावी अथवा समतुल्य परिक्षा पास असावा.

-उमेदवाराचे वय १८ ते ५० दरम्यान असावे.

-उमेदवारास संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणांचे ज्ञान असावे.

-उमेदवार कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा.

-उत्तीर्ण उमेदवारास पाच हजार रुपये राष्ट्रीय बचत पत्र (NSC) सुरक्षा ठेव स्वरूपात भरणे बंधनकारक असेल.

Postal Department recruitment
MSEDCL Go Green : पेपरलेससाठी मदत करा, वीजबिलात सवलत घ्या!

-प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल.

-नंतर आयआरडीए परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारास कायम करण्यात येईल.

-उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य व्यक्तिमत्त्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमाबाबत ज्ञान या आधारावर करण्यात येईल.

-उमेदवाराने मुलाखतीस शैक्षणिक कागदपत्र, तीन फोटो, पॅन कार्ड व आधारकार्ड सहित स्वखर्चाने उपस्थित राहावे.

-अर्जाचा नमुना प्रवर अधीक्षक कार्यालय नाशिक किंवा जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात उपलब्ध आहेत.

-अधिक माहितीसाठी पीएलआय विकास अधिकारी अभिजित वानखेडे यांच्याशी (९७६७१६५१६१) यावर संपर्क साधावा.

Postal Department recruitment
Winter Viral Disease : हवामान बदलाने सिन्नरला रूग्णसंख्येत वाढ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com