सिन्नर- सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत व प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने दिव्यांग बांधवांना सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील कारखान्यांत पात्रतेनुसार नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी प्रहारकडून ७० दिव्यांगाची माहिती असलेले कागदपत्रे स्टाईसचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांच्याकडे जमा करण्यात आले आहेत.