roullete game 1.png
roullete game 1.png

'रोलेट' ऑनलाईन गेम ठरला कर्दनकाळ! तरुणाईला जडले व्यसन व नैराश्य; सायबरतज्ञ सांगतात..

नाशिक : आजकालची तरुणाई ही ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एक मनोरंजन म्हणून याकडे न बघता त्याचे एक व्यसनच तरुणाईमध्ये जडत चालले आहे. आणि याचे गंभीर परिणाम देखील आपल्याला पाहायला देखील मिळतात. ऑनलाइन जुगाराचा गेम 'रोलेट' च्या आहारी जाऊन त्र्यंबकेश्वरमध्ये काही दिवसांपुर्वी एका ३६वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात रोलेट जुगार खेळविणाऱ्या संशयित कैलास शहा व त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात रोलेट जुगार खेळविणाऱ्या संशयित कैलास शहा व त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या घटनेमुळे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ऑनलाईन गेमचे तरुणाईला लागलेले व्यसन आणि त्यातून आलेले नैराश्य....यावर सायबरतज्ञ काय सांगतात....

ग्रामीण भागातही धूमाकूळ 

रोलेट नावाच्या ऑनलाईन गेमने फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातही धूमाकूळ घातला आहे. या जुगाराच्या नादी लागून २ दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये राहणाऱ्या तरुणाला लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आणि याच नैराश्यापोटी नामदेव चव्हाण नामक व्यक्तीने आपले जीवन संपविल्याची घटना त्र्यंबकेश्वर भागातील आंबोलीमध्ये महिनाभरापुर्वी घडली होती. दरम्यान, याप्रकरणी त्र्यंबकेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित शहा याचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते. अखेर त्यास नाशिकमधून ताब्यात घेण्यास बुधवारी पोलिसांना यश आले. 


ऑनलाईन गेमचे व्यसन आणि त्यातून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ

मोबाईल व इंटरनेटचा अधिक वापर, ऑनलाईन गेमचे व्यसन आणि त्यातून होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाणात मध्यंतरी खूप वाढ झाली होती. 

२०१८ मध्ये रशियातील अवघ्या 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू अत्यंत भयानक होता. त्यालाही याच ऑनलाईन गेमचे व्यसन लागले होते. केवळ तो यात हरला तर त्याने चक्क घराच्या मागच्या बगिच्यात जाऊन इलेक्ट्रीक करवत घेऊन स्वत:चं मुंडक उडवलं. ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या आईला जबरदस्त धक्काही बसला होता. कारण तो ज्या कॉम्प्युटरवर हे गेम्स खेळत होता. तो कॉम्प्युटर तिनेच तिला आणून दिला होता. २०१९ मध्ये रेल्वे प्रवासात मोबाइलवर पबजी हा ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळण्यात गर्क असलेल्या एका तरुणाने पाण्याऐवजी केमिकल प्राशन केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आग्रा येथे घडली होती. २०२० मोबाईलवर पब्जी गेम खेळत असतानाच हार्ट अटॅक आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नांदेडमधील 18 वर्षीय युवकाने उपचारापूर्वीच अखेरचा श्वास घेतला होता.

सायबरतज्ञ सांगतात....
ऑनलाईन गेमचा बाजार आणि वापर झपाट्याने वाढतोय. तसेच त्याचे दुष्परिणामही वाढताएत. काही ऑनलाईन गेम्स तर मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. तसेच त्यांचा नकारात्मक प्रभावही पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आणि त्यातूनच आत्महत्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यावर कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे यावर सायबरतज्ञ तन्मय दिक्षीत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

बेरोजगारीमुळे तरुणाई वळतेय या मार्गाकडे... 

बेरोजगारी वाढत चालल्यामुळे ऑनलाईन पध्दतीतून अर्थाजन कशाप्रकारे करता येईल याकडे सध्या मुलांचा कल वाढत आहे. ही मुलं नोकरीधंदा नसल्याने पैसे कमवायच्या मागे अशा मार्गांकडे वळतात आणि मग या दुर्दैवी घटनांचा उदय होतो. 

नैराश्याचे शिकार

गेम म्हटला तर हार-जीत ही होतच असते. पण सध्या स्पर्धेच्या युगात तरुणांना हार पत्करणे पसंत नसते. आणि सतत हार पत्करावी लागत असल्याने तरूण नैराश्याचे शिकार होतात व पैसेही गमावतात.  

काय काळजी घ्याल
ऑनलाईन गेम खेळत असताना त्याचे रेटिंग तसेच  ही अधिकृत डेव्हलपर गेमची कंपनी आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच बनावट कंपन्या असे फेक अॅप तयार करून सायबर गुन्हेगार पैसे हडप करण्यासाठी मार्ग शोधत असतात. आणि त्यात ही तरुणाई फसते. त्यामुळे याबाबतीत सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे - तन्मय दिक्षीत, सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com