नाशिक- सहकार क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विविध पक्षांच्या संचालकांनी बुडविल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. त्यावर त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, असे प्रत्युत्तर कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.