जिल्हा बँक निवडणुक

जिल्हा बँक निवडणुक
Published on: 
हे ॲंकर करू शकता (जिल्हा बँकेचा फोटो वापरावा) लोगो : जिल्हा बँक निवडणूक ------ आता राष्ट्रवादीसोबत बैठकीची प्रतीक्षा महाविकास आघाडी जागांबाबत दिवाळीनंतर घेणार निर्णय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीत मित्रपक्षांसोबत युतीसाठी अनुकूल असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आता भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महायुती होणार असल्याचे चित्र आहे. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत अद्यापही जागांबाबत वाटपाची चर्चा झालेली नाही. यामुळे या निवडणुकीबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. महाविकास आघाडी (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस) ने पंधरा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. असे असताना मात्र महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची अजूनही बैठक झालेली नाही. दिवाळीनंतर आता या बैठकांना वेग येणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननीदरम्यान झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत. ते अजूनही कायमच आहे. मंत्री महाजन यांनी पुढाकार घेत महायुतीने ही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असले तरी अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. याकडेही दुर्लक्षून चालणार नाही. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील, विद्यमान अध्यक्ष संजय पवार यांच्यासोबत अजून भाजपची बैठक झालेली नाही. ती बैठक केव्हा होणार, याकडेही लक्ष लागून आहे. चौकट माघारीनंतर चित्र होणार स्पष्ट आता रविवारी (ता. ८) दिवाळीची सुटी आहे. ११ नोव्हेबरपर्यंत शासकीय कार्यालयांना सुट्या असल्याने आता १२ नोव्हेंबरला कार्यालय सुरू होईल. १७ पर्यंत माघारीची मुदत आहे. कार्यालय सुरू झाल्यानंतर माघारीसाठी सुटीचे दिवस वगळता केवळ चारच दिवस शिल्लक राहतील. यात किती जण माघार घेतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.