मेनफिचर
टुडे एकसाठी
लोगो : जिल्हा बँक निवडणूक
-------------------
चेअरमन पवारांसह केंद्रीयमंत्री खडसेंच्या अर्जांवर हरकती
-------
अर्जांची छाननीवर आज निकाल; आमदार अनिल पाटलांचा अर्ज नामंजूर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी (ता.२) अर्ज छाननीच्या वेळी विद्यमान अध्यक्ष संजय पवार व त्यांंचे कुटूंबीय, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार किशााेर पाटील यांचे पूत्र सुमीत पाटील आदी आठ जणांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या आहेत. सायंकाळी साडेपाचपर्यंत हरकतींवर सुनावणी सुरू होती. हरकतींवरील निकाल निवडणूक निर्णय अधिकार मनोज चौधरी मंगळवाी (ता.३) देणार आहेत.
चेअरमन पवारांसह त्यांच्या कुटूंबातील इच्छूक उमेदवार, केंद्रीय मंत्री खडसेंच्या उमेदवारीवर हरकती घेण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हरकतींवर काय निर्णय होतो? याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सहकार कायद्यातील नवीन नियमानुसार जे संचालक दहा वर्षे संचालक आहेत, ते ही निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत. त्यामुळे आमदार अनिल पाटील (अमळनेर) यांनी दाखल केलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे.
बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध झालेत. त्यानंतर ही निवडणूक आता ‘महायुती’ विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात होणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. असे असले तरी चेअरमनसह कुटूंबीयांच्या अर्जांवर घेतलेल्या हरकतीने राजकारण सुरू झाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे.
-----
चेअरमन पवारांवर हरकती
धरणगावमधून उमेदवार, चेअरमन संजय पवार, सोनल संजय पवार, संग्रामराजे पवार यांच्या अर्जांवर गायत्री भगवान पाटील यांनी हरकत घेतली आहे. त्यात असे म्हटले आहे की, जे दहा वर्षे संचालक आहेत, त्यांना सहकार कायद्यानुसार ही निवडणूक लढविता येणार नाही. चेअरमन पवार हे दहा वर्षे संचालक होते, म्हणून ते अपात्र आहेत. चेअरमन पवार यांच्या पत्नी सोनल पवार, पूत्र संग्रामराजे पवार हेही त्याला अपात्र आहेत. यावर निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी काय निर्णय देतात? याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, चेअरमन पवार यांनी नवीन नियम चेअरमन व कार्यकारी संचालक या पदाला लागू नाहीत. याबाबत पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे. यावरही श्री. चौधरी काय निर्णय देतात? हे पाहणे औत्सूकतेचे आहे.
---------
चौकट
यांच्या उमेदवारांवर अशा हरकती
आमदार किशााेर पाटील यांचे पूत्र-सुमित पाटील यांच्या अर्जावर सतीष शिंदे यांनी हरकत घेतली आहे. श्री. पाटील हे दोन वर्षांपासून सभासद नाहीत, त्यांना अनूभव नाही, असे हरकतीचे स्वरूप आहे. केंद्रीय मंत्री खडसे यांच्या अर्जावर आनंदराव देशमूख यांनी खडसे या थकबाकीदार असल्याची हरकत घेतली. देवयानी देशमूख, विनोद पाटील यांच्या अर्जांवर खडसे यांनी हरकत घेतली आहे. उमेदवार पंढरीनाथ चंपालाल पाटील व वैशााली पंढरीनाथ पाटील हे जिल्हा बंकेचे थकबाकीदार असल्याची हरकत जिल्हा बँकेने घेतली आहे. या सर्व हरकतींच्या निकालावर निर्णयाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मंगळवारी (ता.३) हरकतींवर निर्णय घेऊन अर्ज वैध-अवैध ठरविले जाणार आहेत.