Nashik District Bank
sakal
नाशिक: अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य शासनाने शेतीशी निगडित कर्जवसुलीस वर्षभर स्थगिती दिल्याने जिल्हा बँकेची वसुली ४० कोटींवर अडकली आहे. कर्ज सामोपचार परतफेड योजनेचा कालावधी मार्चअखेर संपुष्टात येत असल्याने त्यानंतर बँकेच्या आर्थिक अडचणी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली.