नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांनी बॅंकेत सव्वातीन कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मालेगावचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तालुक्यातून तब्बल पाच कोटींच्या ठेवी जमविल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.