नाशिक- जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्यालयातील विभागांतर्गत कर्मचाऱ्यांची बदली केलेली असताना काही विभागांतील कर्मचारी जागा सोडत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषदेच्या एका विभागात पाच वर्षे आणि एका ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कर्मचाऱ्यांना काम करता येत नाही. त्यामुळे बदली प्रक्रियेच्या आधारे कर्मचाऱ्यांचे विभाग बदलण्यात येतात.