नाशिक- जिल्हा परिषदेत प्रथमच ‘ई-फाइल’ प्रणाली कार्यान्वित झाली असून, आतापर्यंत २८ हजार ७७६ ई-फाइल्स तयार झाल्या आहेत. यात सामान्य प्रशासन विभाग अव्वल क्रमांकावर असून, पंचायत समिती स्तरावर बागलाण तालुक्याने बाजी मारली आहे. .फायलींचा तातडीने निपटारा होण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेमध्ये ई-फाइल प्रणाली सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेमध्ये सर्व फायलींचे काम ऑनलाइन करण्यात आले. एखादी तक्रार आली तरी आवक-जावक विभागात ती संगणकावर अपलोड करून पुढे सादर केली जात आहे. .उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी यासाठी विभागांसह पंचायत समित्यांकडे पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी बैठका घेत, फायली ऑनलाइन सादर कराव्यात, अशा सूचना केल्या. परिणामी ई-फाइल्स प्रणालीला गती प्राप्त झाली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात २८ हजार हजार ७७६ ई-फाइल्स तयार करण्यात आल्या आहेत. तसेच १५ पंचायत समित्यांमध्ये १४ हजार ३५० फायली तयार केल्या आहेत. पुढील काही दिवसांत ग्रामपंचायतीमध्ये ही प्रणाली होणार आहे..विभागनिहाय सादर केलेल्या ई-फाइल्सबांधकाम विभाग एक (१,०७६), ग्रामपंचायत (१,०६८), आरोग्य (१,०१४), ग्रामीण पाणीपुरवठा (९०३), कृषी (८३२), माध्यमिक विभाग (६४९), बांधकाम दोन (६४३), लघपुपाटबंधारे (६३९), पशुसंवर्धन (५८१), लेखा व वित्त (५६४), बांधकाम विभाग तीन (५५३), समाजकल्याण (५०४), महिला व बालकल्याण (३७७), पाणी व स्वच्छता (२००), मनेरगा (९२), ग्रामीण विकास यंत्रणा (४३), यांत्रीकरण विभाग (५५), समग्र शिक्षा विभाग (१६)..पंचायत समित्या (फाइल्स)बागलाण (१,७९२), निफाड (१,५७६), दिंडोरी (१,४५६), चांदवड (१,२७०), इगतपुरी (१,१७७), येवला (१,११०), नाशिक (८७९), नांदगाव (८५०), त्र्यंबकेश्वर (६९१), सुरगाणा (६८३), मालेगाव (६३८), पेठ (५९१), कळवण (५८८), सिन्नर (५६२), देवळा (४९८)..सामान्य प्रशासन विभाग ‘अव्वल’ई-फाइल तयार करण्यात सामान्य प्रशासन विभाग आघाडीवर असून, दोन हजार ४८८ ई-फाइल्स तयार केल्या आहेत. त्यापाठोपाठ प्राथमिक शिक्षण विभागाने दोन हजार ८६ फाइल्स तयार केल्या आहेत. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.