नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळील जिल्हा परिषदेचा कारभार नवीन इमारतीत स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाने जुलैचा मुहूर्त ठरविला आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी निगडित सर्व विभागांचे स्थलांतर होईल. त्यानंतर जिल्हा परिषदेची जुनी इमारत ही सिंहस्थ प्राधिकरण व एनएमआरडीए या विभागांना वापरासाठी देण्याचे निश्चित झाले आहे.