नाशिक- जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाच कोटी ६२ लाखांचा ढोबळ नफा झाला. सर्व तरतुदी व प्राप्तिकर वजा जाता बँकेला एकूण दोन कोटी ३० लाख ३९ हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या १८ वर्षांतील हा सर्वोच्च नफा असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रवींद्र आंधळे, उपाध्यक्षा धनश्री कापडणीस यांनी दिली.