Nashik Civil Hospital : अनागोंदी, अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, हलगर्जीपणामुळे जिल्हा रुग्णालय चर्चेत

शासकीय आरोग्य यंत्रणा आणि रुग्णालये म्हटले की नाइलाजास्तव त्या ठिकाणी जावे लागणे, असे रुग्णांवर म्हणण्याची वेळ येत असते.
Civil Hospital Nashik
Civil Hospital Nashikesakal

Nashik Civil Hospital : शासकीय आरोग्य यंत्रणा आणि रुग्णालये म्हटले की नाइलाजास्तव त्या ठिकाणी जावे लागणे, असे रुग्णांवर म्हणण्याची वेळ येत असते. जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी, अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे गेले वर्ष जिल्हा रुग्णालय चर्चेत राहिले.

अर्थात वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाचा पदभार बदलताच, मरगळही झटकावी तसा काहीसा बदल जाणवू लागला आहे. मात्र हा बदल टिकून राहावा अशी रास्त अपेक्षा सर्वसामान्यांची असेल. - नरेश हाळणोर ( district hospital is in discussion due to chaos unsanitary shortage of medicines laxity nashik recap 2023 news)

गेल्या वर्षात जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक चर्चेत राहिले ते अनागोंदीमुळे. आरोग्य विभागांतर्गत औषधांच्या पुरवठ्याबाबत राज्यभर प्रश्न निर्माण झाला, तसा तो नाशिक जिल्हा रुग्णालयात झाला. अपुरा औषध साठा निदर्शनास आला. जिल्हा रुग्णालयात संलग्न पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध झाले, परंतु प्रशासकीय अडचणी नेहमीच चव्हाट्यावर आल्या.

त्यामुळे गेल्या जुलैमध्ये शासनाने हस्तांतर रद्द करीत प्रशासकीय जबाबदारी पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वर्ग केली. रुग्णांचा वाढता आलेख पाहता, अतिरिक्त १०० खाटांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ७३० खाटांचे जिल्हा रुग्णालयात आता ८३० खाटांचे झाले आहे. सिंहस्थ इमारतीमध्ये नव्याने अतिदक्षता विभाग कार्यान्वित होतो आहे.

नवीन वर्षात तो कार्यान्वित होऊ शकेल. ट्रॉमाकेअर इमारतीलाही मंजुरी मिळाली असून त्याचेही काम सुरू होते आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचार घेण्यासाठी १० रुपये केसपेपरसाठी द्यावे लागत होते. परंतु शासनाने निर्णय घेत रुग्णांना केसपेपरही मोफत केला आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्हा रुग्णालयात दिवसाला किमान दीड हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात. जिल्ह्यात आदिवासी भाग अधिक आहे. प्रसूती विभागात प्रसूती व शस्त्रक्रिया लक्षणीय होतात. दिवसाला सरासरी १० ते १५ महिलांची प्रसूती होत असते. त्यातही नैसर्गिकरित्या (नॉर्मल) प्रसूतीचे प्रमाण अधिक आहे.

Civil Hospital Nashik
Nashik Civil Hospital : निरीक्षकाअभावी सिव्हिलची स्वच्छता ‘रामभरोसे’

सरत्या काळात कायापालट (डॉ. चारुदत्त शिंदे यांचा फोटो या चौकटीत वापरावा)

जिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षात प्रशासकीय अनागोंदी निर्माण झाली होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यात नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महत्त्वाचे बदल जाणवू लागले आहेत. विशेषतः स्वच्छता आणि कामाचे नियोजन काटेकोरपणे होऊ लागले आहेत.

प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात कोणत्याही कामासाठी पैसे लागत नाहीत, हेच डॉ. शिंदे यांनी अधोरेखित केल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामाची धडाडी आणि निर्णयक्षमतेमुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळू लागले आहेत.

ते याहीपूर्वी मिळतच होते परंतु त्यासाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागत होते, जे आता बंद झाले आहे. यामुळे येत्या वर्षात जिल्हा रुग्णालयात आरोग्य रुळावर येताना दिसेल असेच हे संकेत आहेत.

Civil Hospital Nashik
Nashik Civil Hospital: ना दुर्गंधी.. ना अस्वच्छता... एकदम चकाचक...! नाशिक जिल्हा रुग्णालय टाकतेय कात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com