District Labor Federation Election : 20 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात!

election news
election news esakal

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या जिल्हा संघाच्या (मजूर फेडरेशन) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जाच्या छाननीत चार अर्ज अपात्र ठरले आहेत. ५३ उमेदवारांनी एका जागेसाठी अनेक अर्ज दाखल केलेले असल्याने ते कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे २० जागांसाठी तब्बल १६४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत माघारी आहे. (District Labor Federation Election 164 candidates for 20 seats Nashik News)

election news
Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे येवल्यात 9 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट!

जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. यंदा सात दिवसांत विक्रमी ३७२ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. २० जागांसाठी २२१ अर्ज प्राप्त झाले होते. यात तालुकानिहाय बघता नाशिक (२२), निफाड (१७), चांदवड (दहा), दिंडोरी (सहा), मालेगाव (पाच), येवला (१३), नांदगाव (सहा), इगतपुरी (सात), सुरगाणा (दोन), कळवण (सात), देवळा (१३), पेठ (पाच), सिन्नर (सहा), त्र्यंबकेश्वर (पाच), सटाणा (सात). महिला राखीव (२१), अनुसूचित जाती-जमाती (१६), भटक्या जाती-विमुक्त जमाती (२२), इतर मागास प्रवर्ग (३१) अर्जांचा समावेश आहे.

अर्जाची बुधवारी निवडणूक अधिकारी सुरेशगीर महंत यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यात स्वाक्षरी नसणे, कागदपत्रांची अपूर्णता, अनुमोदक यांचे नाव नसणे आदी कारणांमुळे चार अर्ज बाद झाले आहेत. याशिवाय एका जागेसाठी उमेदवारांनी तीन ते चार अर्ज दाखल केलेले आहेत. असे तब्बल ५३ जादाचे अर्ज कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे १६४ अर्ज शिल्लक आहेत. उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी (ता. १०) प्रसिद्ध केली जाणार आहे. १० ते २४ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी माघारीसाठी देण्यात आला आहे. एका-एका जागेसाठी अपवाद वगळता दहा ते १५ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. ४ डिसेंबरला मतदान होणार आहे.

election news
Pest Control Contract in Dispute : अधिकारी- ठेकेदारांच्या विश्रामगृहावरील भेटीने संशयाचे वर्तुळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com