10 हजारांची लाच मंडलाधिकाऱ्याला पडली महागात! रचला सापळा

bribe
bribeesakal

नाशिक : जमिनीची मोजणी केल्यानंतर इटीसी कागदपत्रांसाठी दहा हजार रुपये घेताना सापळा रचून मंडलाधिकाऱ्याला पकडण्यात आले. नाशिक रोडला बिटको पोलिस चौकीसमोर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (District-Magistrate-arrested-Taking-bribe-nashik-marathi-news)

दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकाऱ्याला अटक

शिंदे (ता. नाशिक) येथील तक्रारदाराने मंडलाधिकारी प्रशांत घोडके (वय ४५) यांच्याकडे शेतजमिनीची झालेल्या इटीएस मोजणीची साक्षांकित प्रत देण्याची मागणी केली. त्यासाठी मंडलाधिकारी घोडके यांनी दहा हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचतलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. गुरुवारी (ता. २४) नाशिक रोड परिसरातील बिटको पोलिस चौकीसमोर घोडके यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, एकनाथ बाविस्कर, प्रफुल्ल माळी यांनी घोडके यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

bribe
अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेचे सूत्र निश्‍चित
bribe
आता डेल्टा प्लसच्या रूपाने कोरोनाचे आव्हान - भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com