नाशिक- जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे विविध धरणांमधील विसर्गात टप्याटप्याने घट करण्यात येत आहे. गंगापूर धरणाची दारे तब्बल दहा दिवसानंतर बंद करण्यात आली. त्यामुळे गोदाघाटावरील पूरस्थिती पूर्णत: निवळली आहे. पालखेडचा विसर्ग थांबविण्यात आला आहे.