फोटो : NSK26H33847
नंदुरबार : स्पर्धेचे उद्घाटन करताना तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात.
-----------------
जिल्हास्तरीय सेपक टकरॉ
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
नंदुरबार, ता. २९ : येथील नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरॉ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी, खो- खो खेळाच्या प्रशिक्षक मीनल थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांतील मुले व मुलींच्या एकूण २३ संघांनी सहभाग नोंदविला.
क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत नंदुरबार जिल्हा क्रीडा परिषद व नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच सेपक टकरॉ युथ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धा पार पडली. अध्यक्षस्थानी डी. आर. हायस्कूलचे क्रीडाशिक्षक जगदीश बच्छाव होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा टेंग सुडो असोसिएशनचे सचिव दिनेश बैसाणे उपस्थित होते. चावरा पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक योगेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डी. आर. हायस्कूलचे क्रीडा शिक्षिका पौर्णिमा पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून दिनेश कुंभार व शरीफ शेख, तन्मय भारोटे, विक्रांत तवर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी नंदुरबार सेपक टकरा युथ असोसिएशनचे जिल्हा सचिव संदीप खलाणे, क्रीडा शिक्षक धनराज अहिरे, हेमचंद्र मराठे, प्रशांत शिंदे यांनी परिश्रम घेतले.