Deepali Ahire, Pravin Panpatil
sakal
वणी: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांना व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयाच्या दीपाली सुकलाल अहिरे यांनी प्राथमिक गटात, तर वणीच्या के.आर.टी. हायस्कूलचे प्रवीण विजय पानपाटील यांनी माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला.