नाशिक: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आयुक्त ५ ऑगस्टला नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी ते विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत राज्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका होतील, असा अंदाज आहे.