Diwali 2023: नाशिकमध्ये यंदा तिप्पट प्रदूषण! वायू-ध्वनिप्रदूषणाने गाठला उच्चांक, फटाक्यांचे प्रमाण जास्त

Diwali Update About Firecracker
Diwali Update About Firecrackeresakal

Diwali 2023: फटाके किती आणि किती डेसिबल आवाजाचे फोडावेत, ते किती प्रदूषण करतात याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेले मापदंड पायदळी तुडवीत यंदा नाशिककरांनी कहरच केला. फटाक्यांमुळे यंदा ध्वनी आणि वायूप्रदूषणामुळे एअर क्वालिटी इंडेक्स दोनशेवर गेला.

गत वर्षी हाच इंडेक्स ७२ ते ७४ च्या आसपास होता, त्यामुळे यंदा फटाके जास्त की मुळातच प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचीच निर्मिती झाली, यावर आता खल सुरू आहे. लक्ष्मीपूजनानंतरच्या दोन तासानंतरच्या या चित्राने सूज्ञ नाशिककर पुरता हादरून गेला आहे. (Diwali 2023 Air and noise pollution tripled in Nashik this year news)

कमीत कमी ध्वनी आणि वायुप्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन करण्यात आले असले तरी त्यावर यंदा कुणाचेच नियंत्रण नव्हते, हे प्रदूषणाच्या उंचावलेल्या पातळीवरून दिसून येते. त्यामुळे नागरिकांबरोबरच प्रशासनाने या फटाक्यांमुळे नक्की किती प्रदूषण होते याची तपासणी करून त्यावर बंदी घालावी, असाही सूर व्यक्त होत आहे.

दरम्यान, आता येणारे तीन दिवस तरी नाशिककरांनी स्वतःहून प्रदूषण कमी करण्याबाबत पावले उचलावीत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात प्रमुख शहरांमध्ये लक्ष्मीपूजनच्या सायंकाळी अकोला आणि नाशिकची एअर क्वालिटी इंडेक्स २०० वर गेल्याची दिसून आले. अकोल्यात २३६, तर नाशिकमध्ये २०६, मुंबई १९९, तर पुण्यामध्ये १९४ असा आढळून आला.

...येथे झाली यंदाची तपासणी

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी नाशिकमध्ये उद्योगभवन, गंगापूर रोड परिसरात, तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये मोजणी करण्यात येते. रात्री आठच्या एक्यूआय तपासणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विशेष प्रयोगशाळेतील फिरत्या बसमध्ये याची तपासणी केली जाते.

यंदा हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी उद्योगभवन, राजीव गांधी भवन, केटीएचएम महाविद्यालय, व्हीआयपी कंपनी, आरटीओ आदी ठिकाणी चाचणी घेण्यात आली. ध्वनिप्रदूषणासाठी सीबीएस, पंचवटी, हिरावाडी, दहीपूल, सिडको नागरी वसाहत, बिटको पॉइंट आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली.

Diwali Update About Firecracker
Diwali Padwa 2023 : आज आहे दिवाळी पाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

यंदाची वाढ अशी

नाशिकमध्ये गत वर्षीच्या ५५.१ च्या तुलनेत यंदा ७३.३ डेसिबल एवढे ध्वनिप्रदूषण झाल्याची नोंद झाली आहे. हवेतील गुणवत्ता गत वर्षी ८२, तर यंदा २०६ झाल्याची नोंद झाली आहे, म्हणजे यंदा तब्बल १५० ने वाढ झाली आहे. मेट्रो शहर सोडून महाराष्ट्रात हवेचे प्रदूषण दुसऱ्या क्रमांकावर होते. यावरून नाशिककरांनी आता सजक होण्याची वेळ आली आहे.

अजूनही येणारे तीन दिवस विनाफटाक्यांनी ग्रीन दिवाळी साजरी केली तर नाशिककरांना शुद्ध हवा मिळणार आहे अन्यथा अनेक नागरिकांना हवेतील गंभीर व घातक घटकामुळे इतर आजाराला आमंत्रण मिळणार आहे.

लक्ष्मीपूजनानंतर...

रविवारी (ता. १२) एअर क्वालिटी इंडेक्स तपासणी करण्यात आली. त्यात सर्वांत जास्त पंचवटी व नाशिक रोड येथे ७३.३, तर सर्वांत कमी हे सिडको येथे ६९.८ एवढी नोंद झाली आहे.

हे आहे चाचणीची आकडेवारी

ठिकाण सकाळी रात्री

सीबीएस - ५०.७५ - ७२.९

पंचवटी - ५८.७७ - ७३.३

दहीपूल - ५८.७४ - ७२.३

सिडको - ५१.७३ - ६९.८

बिटको - ५८ .७५ - ७३.२

"गत वर्षी नाशिककरांनी समजदारी दाखवून दिवाळीत फटाक्यांवर नियंत्रण ठेवल्याने प्रदूषण कमी झाले होते. हवेची गुणवत्ता चांगली होती. यंदा मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. नाशिककरांनी स्वत:हून फटाक्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. येणारे तीन-चार दिवस फटाकेविरहित दिवाळी साजरी करून आपल्या शहरातील शुद्ध हवेचे मानक टिकवून ठेवावे." - राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी एमपीसीबी

Diwali Update About Firecracker
Diwali 2023: दिल्ली, मुंबई अन् पुण्याची घुसमट; फटाक्यांमुळे आगी, भर दिवाळी सणात शहरांना काजळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com