शिरपूर : नियुक्ती बातमी

शिरपूर : नियुक्ती बातमी
Published on: 
SHC26B13603 शिरपूर : नियुक्तीपत्र देताना नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, गटनेते भूपेशभाई पटेल आदी. --------- सोळा कुटुंबांची दिवाळी झाली गोड नगर परिषदेतर्फे युवकांना वारसाहक्काने नियुक्ती सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ७ : दिवाळीच्या पर्वावर येथील नगर परिषदेतर्फे १६ पात्र वारसांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, गटनेते भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) समारंभपूर्वक नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. संबंधित युवकांच्या कुटुंबियांनी खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाल्याची भावना व्यक्त केली. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या प्रस्तावित होत्या. माजीमंत्री अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे या नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आली. दिवाळीनिमित्त आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. उपनगराध्यक्षा संगीता देवरे, शिक्षण व क्रीडा सभापती शामकांत ईशी, बांधकाम सभापती वासुदेव देवरे, आरोग्य सभापती डॉ. वृषाली बडगुजर, महिला व बालकल्याण सभापती अरुणा थोरात, पाणीपुरवठा सभापती गणेश सावळे, माधवराव पाटील, नगरसेवक, नगरसेविका, स्वीकृत सदस्य, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, आस्थापना अधिकारी सतीश कोळी, कार्यालय निरीक्षक मनोहर माळी, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नियुक्ती मिळालेल्या युवकांमध्ये नक्षत्र पाटील, सोहेल पिंजारी, हर्षल अहिरराव, मोईनखान पठाण, ललित भोई, काशिफबेग मिर्झा, राज माळी, खालिद पठाण, यशबारी, मोहम्मद अन्वर, पल्लवी अमराठे, शोहेब पिंजारी, यश वैश्यवाणी, साहिल सय्यद, हुसेन मेहतर व जैद शेख यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.