पान-३
--------
३०-२
शासकीय कार्यालये सलग
पाच दिवस बंद राहणार
--------------
दिवाळीमुळे खासगी आस्थापनांमध्येही सुट्टी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : आनंदपर्व दिवाळीमध्ये यंदा सलग सुट्या आल्या आहेत. शनिवारपासून (ता.७) पुढील पाच दिवस शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावाकडची वाट धरली आहे. खासगी आस्थापनांनाही जोडून सुट्टी असल्याने नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
------------
सलग सुट्यांमुळे शासकीय-निमशासकीय कार्यालयांसोबतच खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना आनंद द्विगुणित झाला आहे. शनिवार (ता.७) आणि रविवार (ता.८) सार्वजनिक सुट्या आहेत. सोमवार (ता.९) ते बुधवार (ता.११) असे तीन दिवस दिवाळीची सुटी असेल. परिणामी शासकीय कार्यालये पुढील आठवड्यात गुरुवारीच (ता.१३) खुली होतील. मात्र, बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ व १३ नोव्हेंबरला रजेचा अर्ज केला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज खऱ्याअर्थाने १६ नोव्हेंबरपासून पूर्ववत होईल.
सार्वजनिक सुट्या व दिवाळीचा सण जोडून आल्याने खासगी आस्थापने व कार्यालयांनाचे कामकाजही थंडावणार आहे. यंदा जोडून सुट्या आल्याने नोकरदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. एकूण दिवाळीचा उत्साह बघता येत्या आठवड्यात शासकीय असो किंवा खासगी आस्थापनांचे कामकाज ठप्प होणार आहे.
---
१६-१
ट्रॅव्हल्स्चे बुकींग फुल्ल
नाशिकमध्ये वास्तव्य करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच खासगी आस्थापनांमधील नोकरदारांनी यंदा जोडून सुट्टी आल्याने कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.६) मध्यरात्रीपासूनच या सर्वांनी खासगी वाहनाने गावाकडे प्रयाण ठेवले. तसेच बहुतांश जणांनी ट्रॅव्हल्स्चे बुकींग केले आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. दरम्यान वेळेवर तिकीट उपलब्ध न होणाऱ्या नागरिकांकडून खासगी वाहनांच्या बुकिंगभर भर दिला जात आहे.
---------------------