दिवाळीच्या सुटीत प्रवासासाठी बसस्थानकांवर गर्दी

दिवाळीच्या सुटीत प्रवासासाठी बसस्थानकांवर गर्दी
Published on: 
टुडे ४, शहर - जिल्हा कॉमन --- NSK26H34819 जळगाव : बसस्थानकावर बसची वाट पाहत बसलेले प्रवासी. --- दिवाळीच्या सुटीत प्रवासासाठी बसस्थानकांवर गर्दी पुणे, मुंबईसह लांबपल्ल्याच्या मार्गांवर जादा बस; शिवशाही, ई-शिवाईच्या अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : दिवाळीचा सण, पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त गावी गेलेले चाकरमानी, माहेरी आलेल्या महिला आणि मामाच्या गावाला गेलेली बच्चे कंपनी आता परतीच्या प्रवासाला लागली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेतल्यानंतर कामावर आणि शाळा-महाविद्यालयांकडे परतण्याची लगबग सुरू झाल्याने सोमवारी (ता. ९) जळगावच्या नवीन बसस्थानकासह रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नागपूर आणि अकोला या मार्गांवर प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत आणि गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द केल्याचा एसटीला फायदा होत आहे. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत परवडणारे भाडे आणि विविध सवलतींमुळे प्रवाशांचा एसटीकडे कल वाढत आहे. ई-शिवाईच्या जादा फेऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले आहे. पुणे, मुंबई आणि नागपूरसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर शिवशाही आणि स्लिपर बसेस सोडण्यात येत आहेत. यासोबतच ई-शिवाईच्या अतिरिक्त फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. एखाद्या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढल्यास उपलब्धतेनुसार तातडीने जादा बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे मार्गावर सर्वाधिक मागणी जळगावसह चोपडा, चाळीसगाव, अमळनेर आणि रावेर येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर जादा गाड्या सोडण्यावर एसटी विभागाचा भर आहे. जळगाव बसस्थानकातून पुण्यासाठी सर्वाधिक बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. चौकट महसुलात वाढ; कर्मचाऱ्यांची धावपळ सणासुदीच्या काळात प्रवासी संख्या वाढल्याने एसटीच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. मात्र, वाढत्या फेऱ्या, प्रवाशांची गर्दी आणि गाड्यांचे नियोजन यामुळे चालक, वाहकांसह बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. कोट दिवाळीत प्रवाशांचा एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असून आता परतीच्या प्रवासासाठी गर्दी वाढू लागली आहे. ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी जादा बसेस सोडल्या जात आहेत. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, जळगाव एसटी विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.