के.डी.गावित विद्यालयात दीपोत्सव साजरा

के.डी.गावित विद्यालयात दीपोत्सव साजरा
Published on: 
(अवतीभवती) ----------- स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात नंदुरबार, ता. ८ : स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील सेवाभावी संस्था व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने चैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रम शहरातील एकलव्य महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. गायक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कासार, प्रा. आनंद अत्रे, अमृता कुंभकर्ण उपस्थित होते. हरिभाऊ सेवा भावी संस्थेचे सचिव डॉ. दीपक अंधारे, डॉ. सी. डी. महाजन, प्राचार्य बी. एस. पाटील, लायन्स डिस्ट्रिक्ट उपप्रांतपाल सुप्रिया कोतवाल, झोन चेअरमन शंकर भाई रंगलानी, लायन्स क्लब अध्यक्ष ॲड.किरण पाटील, सचिव पंकज पाठक, ट्रेझरर डॉ. चेतन बच्छाव, डॉ. सुहास नटावदकर, लायन्स फेमिना क्लब अध्यक्षा रागिणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर कासार यांनी सुर निरागस हो गाण्याने मैफलीला सुरूवात केली. प्रा. आंनद अत्रे यांनी विविध भक्तीगीते सादर केली.अमृता कुंभकर्ण यांनी सरस गाणी सादर करून रसिकांची मने जिकंली. तबल्याची साथ रसिक कुळकर्णी, की बोर्ड कन्हैया खैरनार, ऑक्टो पॅड सुशील केदारे, बासरी तपन बेडसे, हार्मोनियमची साथ प्रसन्न दाऊतखाने यांनी केली. डॉ. दीपक अंधारे यांनी प्रास्ताविक केले. किरण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सी. डी. महाजन यांनी आभार मानले. -------------- (पट्टा) गावित विद्यालयात दीपोत्सव उत्साहात नंदुरबार : तालुक्यातील वावद येथील के. डी. गावित माध्यमिक विद्यालयात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि आनंद वाटून घेण्याची भावना वृद्धिंगत होते, असे मुख्याध्यापक मनोहर साळुंके यांनी सांगितले. दीपोत्सव यशस्वी होण्यासाठी गोपाळ शिंत्रे, नितीन पाटील, सागर पाटील, सुनील पाटील, महेंद्र पाटील, विपुल नेरे, मीनाक्षी व्यास, प्रिती नाईक, अश्विनी पाटील, जागृती पाटील,पावबा ठाकरे, संजय पाटील, दीपक माळी यांनी परिश्रम घेतले. ---------- डंपरची चोरी नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे हॉटेलसमोरील पार्कींगमधून डंपर अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला. याबाबत रिजवान जाकीर खाटीक (रा. सारंगखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल तपास करीत आहेत. ------------ अज्ञात चोरट्याकडून ३० हजारांचे दागिने लंपास नंदुरबार : शहरातील धुळे चौफुली ते प्रकाशा बायपासवर असलेल्या सार्वजनिक जागी अज्ञात चोरट्याने फिर्यादी वासुदेव बळवंत राव (वय ७८, रा. लालबाग कॉलनी, नंदुरबार) यांचे सोने- चांदीचे दागिने लंपास केले. यात सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याची चैन आणि पेडल असा एकूण ३० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल असून, पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्र नगराळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.