पोखरी तांड्यात पालकमंत्री पोखरी तांड्यात पालकमंत्री

पोखरी तांड्यात पालकमंत्री पोखरी तांड्यात पालकमंत्री
Published on: 
NSK26H34816 पोखरी तांडा : मुलांशी संवाद साधताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. -------- पोखरी तांड्यात पालकमंत्र्यांची आगळीवेगळी दिवाळी दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; बंजारा बांधवांशी जपले नाते सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे दिवाळीचा सण. अशा परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची आपली परंपरा जपत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता.८) पोखरी या बंजारा तांड्यात ग्रामस्थांसोबत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. कोणताही शासकीय थाटमाट न करता बंजारा समाजातील माता-भगिनी, वडीलधारी मंडळी आणि चिमुकल्यांच्या सान्निध्यात बसून त्यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. दुष्काळामुळे चिंतेत असलेल्या ग्रामस्थांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, सरपंच गोकुळ शिंदे, उपसरपंच नवल पारधी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, संतोष वंजारी, किसन राठोड, रामलाल चव्हाण, इंदल चव्हाण, धनराज राठोड आदी उपस्थित होते. चौकट बंजारा संस्कृतीचे दर्शन पालकमंत्री पाटील यांचे पोखरी तांड्यात आगमन होताच पारंपरिक वेशभूषेतील बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी महिला व पुरुषांनी एकत्र येत पारंपरिक बंजारा व पावरा गीतांवर नृत्य सादर केले. माता-भगिनींचा उत्साह, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ग्रामस्थांचा स्नेह पाहून पालकमंत्रीही भारावून गेले. त्यांनी सर्वांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.