गरजू मुलांच्या चेहऱ्यावर विद्यार्थ्यांनी फुलविले दिवाळीचे हास्य

गरजू मुलांच्या चेहऱ्यावर विद्यार्थ्यांनी फुलविले दिवाळीचे हास्य
Published on: 
NSK26H34706 वावडदा : एल. एच. पाटील स्कूलतर्फे गरजू मुलांना कपडे, खेळणी, मिठाई व शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्या जयश्री साळुंखे. गरजू मुलांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य दिवाळीनिमित्त कपडे, खेळणी, मिठाई व शैक्षणिक साहित्य वाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा माणुसकीचा संदेश एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला. शाळेच्या वतीने ‘आनंद वाटूया, आनंद पसरवूया’ या उपक्रमांतर्गत परिसरातील आदिवासी व गरजू कुटुंबांतील २५० हून अधिक मुलांना कपडे, खेळणी, मिठाई, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शाळेने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला. यासाठी शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना चांगल्या स्थितीतील जुने कपडे, खेळणी आणि उपयोगी वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, जुन्या कपड्यांसोबत अनेक पालकांनी नवीन कपडेही भेट दिले. विद्यार्थ्यांनीदेखील स्वेच्छेने या उपक्रमात सहभाग नोंदविला. जमा झालेल्या कपड्यांची शिक्षकांनी वयोगटानुसार आणि मापानुसार वर्गवारी केली. त्यांचे व्यवस्थित पॅकिंग करून मिठाईचे स्वतंत्र बॉक्स तयार करण्यात आले. एकूण १५ मोठ्या बॉक्समध्ये साहित्य भरून त्याचे वितरण करण्यात आले. ५ नोव्हेंबरला सायंकाळी शाळेच्या बसमधून प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी भेटवस्तू घेऊन सामनेर, नांद्रा, बोरनार, म्हसावद आदी गावांमध्ये पोहोचले. यावेळी गरजू मुलांना दिवाळीच्या भेटवस्तू देण्यात आल्या. भेटवस्तू मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जितेंद्र पाटील आणि वैशाली पाटील यांनी उपक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. प्राचार्या जयश्री साळुंखे आणि पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सुजाता सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.