दीपावली पहाट उपक्रम

दीपावली पहाट उपक्रम
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी...(बातमी अँकरच्या वरील जागेत घेणे, राजवाडे मंडळ बातमी अँकर आणि छोटी जाहिरात यांच्या मधील जागेत घेणे ) --- फोटो क्रमांक : 34910 धुळे : कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था, जोगाईमाता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण भवनमध्ये झालेल्या दीपावली पहाट संगीत मैफलीप्रसंगी उपस्थित मान्यवर. --- दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देत दीपावली पहाट धुळ्यात सामाजिक बांधिलकी जपत रंगली संगीत मैफल सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, जनावरांच्या चारा-पाणी टंचाईवर उपाययोजना आणि दीपावलीच्या आनंदापासून वंचित गरीब कुटुंबांना फराळ वाटप यांसारख्या सामाजिक उपक्रमांची सांगड घालत येथे ‘दीपावली पहाट’ संगीत मैफल उत्साहात पार पडली. कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था आणि कापडणे (ता. धुळे) येथील जोगाईमाता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. लक्ष्मीपूजनाच्या पर्वानिमित्त राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कल्याण भवन येथे झालेल्या या मैफलीचे उद्‍घाटन पुणे येथील प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग येथील मुख्य अभियंता अनिल पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन जोगाईमाता संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी केले. दुष्काळग्रस्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि वंचितांची दिवाळी गोड करणे, हे कृतिशीलचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अनिल पवार यांनी केले. या मैफलीत संस्थेचे सभासद अविनाश मोरे, डी. डी. सोनार, राजेंद्र महाले, ॲड. धनराज भामरे, राजेश सोनार, अशोक खैरनार, गिरीधर खेडवनकर व अरुण विसपुते यांनी भावगीते, अभंग व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच अभियंता वासुदेव पवार यांच्या संगीत समा ऑर्केस्ट्राच्या आसावरी गुरव, गायक पारिजात चव्हाण, ऋषिकेश चव्हाण व सुरेश चत्रे यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांची माहिती देणे व गरजूंना फराळ वितरणाचे कार्य कार्यकर्त्यांमार्फत सुरू असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले. कृतिशीलचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी निवृत्तांनी आपला अनुभव समाजहितासाठी वापरावा व छंद जोपासत संस्थेशी जोडून घ्यावे, असे आवाहन केले. निवृत्त शिक्षणाधिकारी जयप्रकाश पाटील यांनी काव्यवाचन व गीतगायनातून मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र माळी, मेहेरगावचे उपसरपंच दिनेश पाटील, आशा पाटील, हर्षदा पाटील, सुनंदा निकम, मिलिंद मिस्त्री, देविदास शिरुडे, हरिश्चंद्र रेंडे, बी. एन. बिरारी, कैलास चौधरी, अंबादास खैरनार, प्रदीप जगताप, प्रा. ए. डी. पाटील आदी उपस्थित होते. महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.