टुडे २ ॲंकर
लोगो : वेध दीपोत्सवाचे (लोगोमध्ये दिवा वापरावा)
--
NSK26H33576, NSK26H33577
जळगावः दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीसाठी आलेल्या दीपमाळा व आकर्षक झुंबर.
---
झगमगणाऱ्या दीपमाळांनी सजली बाजारपेठ
‘एलईडी’सह विविध प्रकार विक्रीसाठी दाखल; सजावटीच्या पणत्यांना पसंती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : दिवाळीचा सण जवळ आल्याने घराघरांत साफसफाई आणि सजावटीची लगबग सुरू झाली आहे. घराला आकर्षक रूप देण्यासाठी यंदा पारंपरिक पणत्यांसोबतच रंगीबेरंगी एलईडी माळा, चमचमणारे दिवे, पडद्यासारखी लाइटिंग, डिझायनर दिवे आणि विविध आकारांतील सजावटीच्या रोषणाईला पसंती मिळत आहे. बाजारपेठेत विविध रंग, आकार आणि किमतींमध्ये लाइटिंगचे पर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडून खरेदीची चाचपणी सुरू झाली आहे.
दिवाळीत घराचा कोपरा न् कोपरा उजळविण्यासाठी नागरिक विविध पर्यायांचा विचार करत आहेत. मुख्य दरवाजा, खिडक्या, बाल्कनी, गॅलरी आणि घराच्या बाहेरील भिंती सजविण्यासाठी एलईडी माळा, रंग बदलणारे दिवे आणि पडद्याप्रमाणे लावता येणाऱ्या लाइटिंगचा वापर केला जात आहे. बाजारात फुलांच्या आकारातील दिवे, ताऱ्यांच्या माळा, कंदील, आकर्षक लॅम्प आणि विविध डिझाइनमधील सजावटीचे दिवे उपलब्ध आहेत.
‘एलईडी’ला पसंती
बाजारात एलईडी तंत्रज्ञानावरील विविध प्रकारच्या माळा आणि दिवे उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी, एकाच रंगातील तसेच विविध पद्धतीने चमकणाऱ्या लाइटिंगचे पर्याय ग्राहकांना आकर्षित करत आहेत. काही दिव्यांमध्ये प्रकाशाच्या विविध पद्धती निवडण्याची सुविधाही आहे.
सजावटीचे पर्याय
बाजारात कमी किमतीतील साध्या विद्युत माळांपासून ते मोठ्या जागेसाठी वापरल्या जाणाऱ्या आकर्षक सजावटीच्या लाइटिंगपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. घराच्या आकारानुसार, सजावटीच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार ग्राहक खरेदी करत आहेत.
५० ते ५०० पर्यंत माळा
बाजारात ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या आकर्षक लाइटिंग उपलब्ध आहेत. कमी किमतीतील साध्या एलईडी माळांपासून रंगीबेरंगी दिवे, पडद्यासारखी लाइटिंग आणि डिझायनर लाइटिंगपर्यंत अनेक पर्याय ग्राहकांना मिळत आहेत.
कोट
बाजारात यंदा विविध प्रकारच्या आकर्षक दीपमाळा उपलब्ध आहेत. एलईडी माळा, पडद्यासारख्या दीपमाळा, रंगीबेरंगी दिवे आणि ‘डिझायनर लॅम्प’ यांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. कमी बजेटमध्ये घर सजविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहक आपल्या गरजेनुसार खरेदी करत आहेत.
- विनोद पाटील, विक्रेता