NSK26H34688
जळगाव : दृष्टिहीन, दिव्यांग बांधवांना दिवाळीचे फराळ वाटप करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, उपमहापौर मनोज चौधरी, प्रतिष्ठानेच अध्यक्ष श्याम कोगटा, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा आदी.
दृष्टिहीन, दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद
शिवसेना आणि ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे मिठाई, फरसाणचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि दृष्टीहीन तसेच दिव्यांग बांधवांचीही दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून शिवसेना आणि ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मिठाई व फरसाण वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, उपमहापौर मनोज चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, पप्पूशेठ लुंकड, रवींद्र नवाल, नीलेश मदानी आणि ॲड. बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम कोगटा यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना मिठाई व फरसाणचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी नगरसेवक राजू मोरे, प्रा. सतीश कोगटा, पवन ठाकूर, किरण राजपूत, रमेश माळी, सम्राट बेलदार, प्रशांत ठाकरे, अर्जुन साळुंखे, कैलास ठाकरे, संजय सपकाळे, योगेश जाधव, विजय चौधरी, रवींद्र परदेशी यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने सहकार्य केले.