सव्वालाखावर कुटूंबांना मिठाईफराळ भेट

सव्वालाखावर कुटूंबांना मिठाईफराळ भेट
Published on: 
(पान ४ ला ॲंकर) KPD26B13594 लामकानी : दिवाळीच्या फराळ वाटपप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ. ----- दुष्काळी परिस्थितीत पेटवली गोडव्याची ज्योत सव्वालाखावर कुटुंबांना फराळ वाटप; आमदार राम भदाणे यांचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. २ : मॉन्सूनने पाठ फिरवल्याने शेतीशिवार भेगाळले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब कुटुंबाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा भीषण दुष्काळी परिस्थितीत जेव्हा चुलीवरची भाकरीही जड वाटत असताना दिवाळीचा फराळ कसा करायचा, हा प्रश्न प्रत्येक घरासमोर होता. अशा परिस्थितीत आमदार राम भदाणे यांनी धुळे तालुक्यात सव्वा लाखावर कुटुंबांपर्यंत दिवाळीच्या मिठाईसह फराळ पोहचविला आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत मिठाईसह दिवाळी फराळाची भेट पोहोचवून आमदार राम भदाणे यांनी सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्याच्या बांधापासून ते शेतमजुराच्या झोपडीपर्यंत आणि गोरगरीब सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत हा गोडवा पोहोचत आहे. आमदार भदाणे यांनी मतदारसंघातील जनतेत मिसळून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. भदाणे कुटुंबाच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून ही अनोखी परंपरा अविरत सुरू आहे. ही सामाजिक बांधिलकी सलग चौथ्या वर्षीही तितक्याच उत्साहात राबवण्यात येत आहे. सामाजिक वारसा या सामाजिक बांधिलकीत केवळ आमदार राम भदाणे एकटे नाहीत, तर माजी आमदार अण्णासाहेब (कै.) द. वा. पाटील कुटुंबाची सामाजिक कृतज्ञतेची भावना आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, नगावच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून हा संकल्प सोडला आहे. धुळे ग्रामीणच्या मातीने त्यांना जे दिले, त्याची परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ------ धुळे ग्रामीणमधील जनता यंदा भीषण दुष्काळाने होरपळली आहे. या दुष्काळामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. हा आनंद वाढवण्यासाठी व दुष्काळाची झळ थोडी कमी करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शासनाची मदत मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. यंदाही दिवाळीत मिठाई वाटप करून दुष्काळातही सर्वांचा आनंद वाढवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे. - राम भदाणे, आमदार, धुळे ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.