धुळे : टुडे पान २ साठी... मेन
--
(लोगो : आली दिवाळी) कालच्या बातमीतून घेणे
फोटो क्रमांक : 34231, 34232
धुळे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत मातीच्या पारंपरिक आणि नक्षीदार पणत्या खरेदी करताना ग्राहक. दुसऱ्या छायाचित्रात विक्रीसाठी आलेले मातीचे आकर्षक झुंबर, कंदील आदी. ( छायाचित्रे : गोरख गर्दे )
--
पारंपरिक सोबतच नक्षीदार पणत्यांची मागणी
--
दिवाळी बाजारात चैतन्य; कलाकुसरीला, आधुनिक रोषणाईला ग्राहकांची पसंती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : आनंदाचा आणि प्रकाशाचा महाउत्सव असणाऱ्या दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांमध्ये रोषणाई, गृहसजावटीच्या तयारीला वेग आला असून, यंदाच्या दिवाळीत पारंपरिक मातीच्या कलाकुसरीच्या वस्तू आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. विशेषतः मातीच्या नक्षीदार पणत्या, बाजारात नव्याने दाखल झालेल्या पाण्यावर पेटणाऱ्या दिव्यांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
-
शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पणत्यांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. साध्या मातीच्या पणत्यांपासून ते आकर्षक रंगीबेरंगी डिझाईन्स, हस्तनिर्मित आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेषतः स्थानिक कुंभार कारागिरांनी तयार केलेल्या पारंपरिक मातीच्या दिव्यांना मोठी मागणी असून, यामुळे यंदा या स्थानिक कारागिरांना आर्थिक आधार मिळत आहे. साध्या मातीच्या पणत्यांचे दर सहा नगासाठी २० रुपयांपासून सुरू होत आहे. तर आकर्षक रंगीत पणत्या प्रतिनग २० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
-
मातीच्या पणत्यांवतिरिक्त बाजारात नावीन्यपूर्ण वस्तूंनीही बाजारपेठ फुलून गेली आहे. गुजरातमधील लाल मातीपासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक कलाकुसरीच्या पणत्या महिलावर्गाला विशेष आकर्षित करत आहेत. यासोबतच आधुनिकतेची जोड देत इलेक्ट्रिक पणत्या, एलईडी दिवे, मातीचे कंदील, मेटल व पत्रापासून बनवलेल्या आकर्षक दिव्यांनी बाजारपेठेची रोषणाई वाढवली आहे. आधुनिक दिव्यांची चमक वाढली असली तरी पारंपरिक मातीच्या दिव्यांचे महत्त्व आजही कायम आहे. यंदा मातीच्या झुंबरांसोबत विविध आकारातील पणत्या, सजावटीचे दिवे आणि कलात्मक मातीच्या वस्तूंना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
गृहसजावटीच्या वस्तूंना मागणी
बाजारात पारंपरिक पणत्यासोबतच मातीचे झुंबर, मातीचे कंदील, मातीचे दिवे-झुंबर साधारण १०० रुपये पासून ते ५०० रुपये पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची आवड असलेल्या नागरिकांकडून अशा वस्तूंची खरेदी केली जात आहे. मातीच्या दिव्यांसोबतच मातीचे आकाशकंदील, आकर्षक तोरण, सुंदर नक्षीकाम असलेले दिवे आणि लहान मुलांसाठीचे मातीचे गोलक अशा विविध गृहसजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. घराच्या प्रवेशद्वारापासून ते बाल्कनी, खिडक्या आणि अंगणापर्यंत सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रोषणाईचा वापर केला जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेला मिळालेल्या या स्वरूपामुळे आनंदाचे वातावरण आहे.