Diwali Festival 2022 : दिवाळीनिमित्त बाजारपेठ गर्दीने फुलली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens buying pooja materials for Diwali.

Diwali Festival 2022 : दिवाळीनिमित्त बाजारपेठ गर्दीने फुलली!

जुने नाशिक : लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. नवीन कपडे, पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

सोमवारी (ता. २४) रविवार कारंजा आणि मेन रोड गाडगे महाराज पुतळा ते बादशाही कॉर्नर चौकपर्यंत पणती, गाडघे (छोटे माठ), रांगोळी, लक्ष्मीमातेची मूर्ती, प्रतिमा, लक्ष्मी पावले, चौरंग, पाठ, केरसुनी (झाडू), आकाश कंदील, भाऊबीजसाठी लागणारे करगोटे, छापील रांगोळी स्टिकर, प्लॅस्टिक तोरण, मुरमुरे, बत्ताशे, अशा विविध वस्तुंची दुकाने थाटली होती. (Diwali Festival 2022 market is crowded on occasion of Diwali Nashik news)

हेही वाचा: SAKAL Impact : चैनस्नॅचर्सविरोधात सिडकोत कडेकोट नाकाबंदी

प्रत्येक दुकानावर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होती. नवीन कपडे अन्य विविध वस्तू खरेदीसाठी मेन रोड, शालिमार, दहिपूर, कानडे मारुती लेन बाजारपेठत गर्दी झाली होती. साहित्य विक्रीतून शहरात गेल्या चार-पाच दिवसांत लाखोंची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

मेन रोड, शालिमारला गर्दीचा महापूर

भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिरापासूनचा रस्ता रविवारी सकाळपासून सर्व वाहनांसाठी बंद केला होता. या ठिकाणी पूजा साहित्यासह अन्य वस्तुंची दुकाने मोठ्या प्रमाणावर लागल्याने ग्राहकांना स्थानिक ठिकाणीच वस्तू उपबल्ध झाल्या. तयार कपडे व ड्रेस मटेरियलसाठी शालिमार परिसरात मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून लाखो रुपयांच्या कपड्यांची विक्री झाली. खरेदीदारांनी दुकानांपेक्षा रस्त्यावरील खरेदीला अधिक पसंती दिली.

हेही वाचा: Diwali : दीपोत्‍सवात करा आरोग्यदायी साजशृंगार; दागिने अन् शरीरस्वास्थ्याचा आहे गूढ संबंध

टॅग्स :Diwali FestivalNashik