टुडे ४ : मेन फिचर
उद्या वसुबारस..प्रकाशाच्या मंगलपर्वास सुरवात!
उपशीर्षक
दीपोत्सवानिमित्त चैतन्य; यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : प्रकाशपर्व.. अर्थात, दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि फटाक्यांचा सण नसून तो प्रेम, आनंद, बंधुभाव, कृतज्ञता, समृद्धी आणि संस्कारांचा उत्सव आहे. आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञान, सद्भावना आणि आनंदाचा प्रकाश पसरवणे हाच दिवाळीचा खरा संदेश आहे.. अशा या प्रकाशपर्वास गुरुवारी (ता.५) प्रारंभ होत आहे.
गोवत्स बारस अर्थात, वसुबारसपासून सुरु होणारा हे प्रकाशपर्व यमा द्वितीय म्हणजेच, भाऊबीजेपर्यंत उत्सव म्हणून साजरा करण्यात येते. ५ ते ११ नोव्हेंबरपर्यंत दीपोत्सव साजरा होणार असून त्यातील प्रत्येक दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
----
NSK26H34419
वसुबारस (गोवत्स द्वादशी)
गुरुवारी (ता.५) वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण आहे. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. गाय ही भारतीय संस्कृतीत मातेसमान मानली जाते. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, पशुधनाचे महत्त्व जाणणे आणि निसर्गाशी प्रेमाचे नाते जपणे हा या सणाचा संदेश आहे.
----
NSK26H34422
धनत्रयोदशी (धनतेरस)
शुक्रवारी (ता.६) धनत्रयोदशी असून या दिवशी भगवान धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धन्वंतरी हे आरोग्य आणि आयुर्वेदाचे देवता मानले जातात. या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. आरोग्य, समृद्धी आणि सुख-शांतीचे महत्त्व हा या सणाचा संदेश आहे.
---
NSK26H34423
नरक चतुर्दशी
रविवारी (ता.८) नरक चतुर्दशी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून जनतेला त्याच्या जाचातून मुक्त केले, अशी पौराणिक कथा आहे. पहाटे अभ्यंगस्नान करून सुगंधी उटणे लावले जाते आणि दिवे लावले जातात. वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय हा या सणाचा संदेश आहे.
-----
NSK26H34424
लक्ष्मीपूजन (दीपावली)
रविवारीच (ता.८) लक्ष्मीपूजन आहे. अमावस्या असूनही हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. घराची स्वच्छता करून रांगोळी, पणत्या आणि दिव्यांनी घर सजवले जाते. व्यापारी वर्ग नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतो.
----
NSK26H34426
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
मंगळवारी (ता.१०) बलिप्रतिपदा आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. राजा बळीच्या उदारतेची आणि दानशूरतेची आठवण या दिवशी केली जाते. महाराष्ट्रात पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, आदर आणि विश्वास व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.
-----
NSK26H34425
भाऊबीज (यमद्वितीया)
बुधवारी (ता.११) भाऊबीज आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व सुखसमृद्धीची प्रार्थना करते. भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि अतूट नात्याचे महत्त्व सांगणारा हा सण आहे.
---------