धुळे : टुडे १ साठी...ॲंकर
--
लोगो छायाचित्र : आकाशकंदील घेणे
--
वसुबारसापासून ‘प्रकाश पर्वा’ला होणार सुरुवात
--
जिल्ह्यात लखलखत्या दिव्यांनी उजळली शहरे अन् ग्रामीण भाग; बाजारपेठांत गर्दी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची अन् सकारात्मकतेची पंक्ती प्रज्वलित करणाऱ्या दीपावलीत्सवाला गुरुवारपासून (ता. ५) चैतन्यात प्रारंभ होत आहे. संस्कृतीतील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज झाला आहे. लखलखत्या दिव्यांचा प्रकाशमयी सण असणारा दीपोत्सव अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. वसुबारस (गोवत्स द्वादशी) गुरुवारी असल्याने या दिवशी पहिला दिवा लावून दिवाळीची सुरुवात होईल.
-
सुख, समृद्धी आणि मांगल्याची चाहूल घेऊन आलेल्या या सणाच्या स्वागतासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा नवनव्या वस्तूंनी सजल्या असून, मागील आठवडाभरापासून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. दसरा संपल्यानंतर दिवाळीची चाहूल लागते आणि सर्वत्र उत्साहाचे वारे वाहू लागतात. दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून आणि फराळाच्या पदार्थांच्या साथीने दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदाही दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठा गजबजल्या आहेत. सजावटीचे साहित्य, सुगंधी उटणे, तेल, मिठाई यांसह नवे कपडे, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.
-
फराळाचा सुवास घरोघरी
दिवाळीचा अविभाज्य भाग असणारे फराळाचे पदार्थ तयार करण्यास महिला वर्गानी वेग दिला आहे. घरगुती फराळासह महिला बचत गटांनी तयार केलेल्या फराळालाही बाजारात मागणी आहे. अनेकांनी फराळातील बरेच पदार्थ घरीच तयार करण्यास प्राधान्य दिले असून लाडू, चकली, शंकरपाळे, चिवडा आदी पदार्थांचे खमंग सुगंध घरोघरी दरवळत आहेत.
-
१४-१
...चौकट...
१४-१
दीपोत्सवाचे चैतन्यमय पर्व
अंधःकारावर मात करत सारे विश्व प्रकाशमान करणाऱ्या दीपोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. यात गुरुवारी (ता. ५) दिवाळीचा पहिला दिवस असलेल्या वसुबारसनिमित्त गाय-वासरू पूजन केले जाईल. शुक्रवारी (ता. ६) धनत्रयोदशी व यमदीपदानानिमित्त आरोग्याची देवता धन्वंतरी व संपत्तीचे पूजन होईल. रविवारी (ता. ८) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन एकाच दिवशी आले असून घरोघरी लक्ष्मीपूजन आणि व्यापारी वर्ग वहीपूजन करतील. मंगळवारी (ता.१०) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा होणार असून बुधवारी (ता. ११) भाऊबीजेने या प्रकाश पर्वाचा समारोप होईल.