पान-२ अँकर
फोटो : 08912, 08913
तारीचामोढा (ता. इगतपुरी) : येथील आदिम कातकरी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करताना सुहास शिंदे, विक्रम पवार, मंगेश पाळदे, संदीप मेढे, राम शिंदे, आबाजी बारे आदी.
आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर उमलले हसू
नीरा फाउंडेशनकडून कातकरी वस्त्यांवर दिवाळी फराळवाटप
--------------------------------
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. ६ : दीपोत्सवाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः वंचित आणि दुर्गम भागातील बांधवांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देवळाली कॅम्प येथील नीरा फाउंडेशनतर्फे तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्गम, आदिवासी, कातकरी वस्त्यांवर जाऊन संस्थेतर्फे ग्रामस्थांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. नीरा फाउंडेशनतर्फे टाकेद बुद्रुक, अधरवड, तारीचामोढा, परदेशवाडी, टाकेद खुर्द, उंटवाडी, धामणगाव आदी गावांतील आदिवासी कातकरी वस्त्या, वाड्यांमध्ये दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. सुमारे एक हजार कुटुंबांना हे वाटप करण्यात आले.
दुर्गम भागातील कातकरी कुटुंबांना गरिबी आणि रोजगाराच्या अभावामुळे दिवाळीचा आनंद घेता येत नाही. तसेच यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे परिस्थिती आणकी हलाखीची झाल्याने नीरा फाउंडेशनतर्फे दिवाळी फराळाचे वाटप झाले.
सण-उत्सव हे सर्वांसाठी असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सणाचा आनंद पोहोचवणे हेच आमचे मुख्य कर्तव्य आहे. या बांधवांच्या चेहऱ्यावरील हसू हीच आमच्यासाठी दिवाळीची खरी भेट आहे, अशी भावना नीरा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुहास शिंदे यांनी व्यक्त केली.
उपक्रमात फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुहास शिंदे, राम शिंदे, विक्रम पवार, मंगेश पाळदे, संदीप मेढे, रोशन गावंडे, स्वप्नील गवळी, किरण धोंगडे, रोशन गवळी, गणेश निसाळ, हृषीकेश निसाळ, आकाश गावंडे, ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे, निवृत्ती ठोके, नवनाथ निर्मळ, गणेश वाजे, पांडुरंग गाढवे आदी सहभागी झाले होते. फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. राम शिंदे यांनी आभार मानले.
-----------------------------