Narak Chaturdashi
sakal
नाशिक: दोन दिवसांपासून दीपावली उत्सवास अभूतपूर्व उत्साहात सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशी असून, त्यानिमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी होणार आहे. मंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजन असून, त्यानिमित्त बाजारपेठेसह घराघरांत चैतन्य अवतरले आहे.