पान-२ अँकर
फोटो : 34606
नंदुरबार : दिवाळी शिधा किट वाटपप्रसंगी उपस्थित डॉ. अभिजित मोरे. शेजारी रतन पाडवी, सुरेश नाईक, सीताराम पावरा, योगेश चौधरी, सीमा सोनगिरे, सुनीता शिंपी आदी.
---------------
‘रोहयो’वरील २५ हजार मजुरांची दिवाळी गोड
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातर्फे दिवाळी शिधा किटवाटप
नंदुरबार, ता. ५ : दुष्काळात जिल्ह्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी, यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातर्फे ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवरील सुमारे २५ हजार मजुरांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा शाळेत हा उपक्रम झाला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. अक्कलकुवा येथील दुष्काळाची पाहणी करताना पालकमंत्री मुश्रीफ यांना अनेक मजूर स्थलांतरित होत असल्याचे निदर्शनास आले होते. जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४० टक्केच पाऊस झाल्याने शेतकरी तसेच मजुरांचे हाल पाहून पालकमंत्री व्यतीत झाले होते. राज्य शासन दुष्काळात जनतेच्या मागे उभे असले तरी पालकमंत्री म्हणून आपण या जिल्ह्याचे काही देणे लागतो, या भावनेतून रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवरील मजुरांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यानुसार मजूर, दिव्यांग व अल्पसंख्याक कुटुंबीय अशा एकूण २५ हजार कुटुंबीयांना दिवाळीचे शिधा किटवाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी (ता. ५) शहरातील मदर तेरेसा शाळेत जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींचे ग्रामरोजगार सेवक तसेच ग्रामस्तरावर काम करणारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले. या वेळी गावनिहाय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक किलो साखर, रवा, खाद्यतेल, पोहे व बेसनपीठ अशा पाच वस्तूंचा समावेश असलेले किट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रतन पाडवी, शहादा पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश नाईक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, योगेश चौधरी, महिला आघाडीच्या सीमा सोनगिरे, सुनीता शिंपी यांच्या हस्ते वाटप झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निंबा माळी, शहादा तालुकाध्यक्ष संतोष पराडके, झेलसिंग पावरा, जिल्हा कोशाध्यक्ष उमेश जैन, संगीता पाडवी, डॉ. योगेश पाटील, सुरेंद्र कुवर, राजू बाविस्कर, मोहन माळी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, यशवंत ठाकरे, सुरेश भाबड, अनिल चौधरी, हारून हलवाई, प्रदीप मराठे, अलिम मक्राणी, छोटू कुवर आदी उपस्थित होते.
...........
कोट---
पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी दुष्काळग्रस्त व रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी शिधा किटवाटप करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. पात्र कुटुंबापर्यत शिधा किट पोहोचविण्याची जबाबदारी भेदभाव न करता ग्रामरोजगार सेवक तसेच ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. सर्वानी या उपक्रमास सहकार्य करावे.
- डॉ. अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस