लोगो : प्रेरणादायी
------
दोनशे वंचित कुटुंबांच्या
घरात माणुसकीचा दिवा
-------
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचा ''एक फराळ गरजूंसाठी'' उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : येथील निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या ''एक फराळ गरजूंसाठी'' या सामाजिक उपक्रमांतर्गत यंदा बडवानी तांडा,''पानशेवरी, बढाई व चांदण्या तलाव गाववस्ती परिसरातील दोनशे गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानने २०१७मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षांपासून कोणताही खंड न पडता हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
या सेवाकार्यासाठी हाऊस ऑफ ज्वेलर्स बाय बाफना यांचे संचालक सुनील बाफना, शिल्पा मल्हारा व एल. एच. पाटील स्कूल परिवार, अविनाश काकाजी शिलेहार यांच्या स्मरणार्थ नवीन चौकसे व शिल्पा चौकसे, ठाणे जिल्ह्यातील सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, माँ तारा फूडचे संचालक योगेश तलरेजा, सिद्धेश दहाड, डॉ. कोमल पाटील, तृप्ती दोषी, हर्षदा पाटील, वंदना थोरात यांनी मोलाचे आर्थिक व सामाजिक सहकार्य केले.
विशेषतः लंडन येथून या सेवाकार्यासाठी सहकार्य करणारे नवीन चौकसे यांचे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दानशूर व्यक्ती व संस्थांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीमुळेच दोनशे कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविणे शक्य झाले.
११४-१
यांचा होता सहभाग
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे धीरज जावळे, पूनम भाटिया, धनंजय सोनवणे, सुलतान पटेल, शारदा सोनवणे, नीलेश राजपूत, किरण महाजन, देवीदास महाजन, वेदांत ताडे, दिशा ताडे, अनन्या अल करी, भय्या पाटील, हर्षल महाजन, प्रणव धनगर, शिवाज्ञा जावळे, संस्थेचे संस्थापक अविनाश जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.