SGR26B07637
सोनगीर : दिव्यांगांना किराणा दिवाळीचे कीट वाटप करताना मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, गटविकास अधिकारी गणेश चौधरी आदी.
------
दिवाळीनिमित्त दिव्यांगांना
किराणा कीटचे वाटप
सोनगीर, ता. ६ : येथील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे अंध, दिव्यांग, ऊसतोड कामगार, गरीब, गरजू, निराधार, वंचित, भटके अशा २०१ कुटुंबियांना दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी एक किराणा दिवाळी किट व पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्यातर्फे ६० एकल महिलांना भाऊबीजनिमित्त साडी- चोळी व फराळ वाटप केले.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. जगदीश गिंदोडिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी गणेश चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त संजय सैंदाणे, प्रशासक एच. डी. महंत, गटनेते अविनाश महाजन, माजी सरपंच लखन ठेलारी, केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत अधिकारी मेघश्याम बोरसे, अल्ताफ कुरेशी, शफीयोद्दीन पठाण, इरफान कुरेशी, प्रकाश गुजर, गोरख पाटील, उत्तम महाजन, अनिल पाटील आदी उपस्थित होते. दिवाळी किटमध्ये वेगवेगळ्या २० प्रकारचा किराणा देण्यात आला. या वेळी पात्र लाभार्थी दिव्यांगांना ग्रामपंचायतीतर्फे धनादेश देण्यात आला. जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप माळी यांनी प्रास्ताविक केले. हाजी आरिफ खॉ पठाण यांनी सूत्रसंचालन केले. जोशाबा मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.