दुष्काळी परिस्थितीतही दिवाळी सुट्ट्यामध्ये पर्यटनाला चालना

दुष्काळी परिस्थितीतही दिवाळी सुट्ट्यामध्ये पर्यटनाला चालना
Published on: 
पान तीन ॲंकर ----------------- दिवाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला चालना खासगी वाहनचालकांचा व्यवसाय वधारला विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता.१४ : दीपोत्सवाचा सण संपताच अनेकांना सुट्ट्यांमध्ये देवदर्शन व पर्यटनाचे वेध लागले आहेत. आठवड्यापासून विविध देवस्थानासह इतर राज्यातील पर्यटन स्थळावर नागरिकांची गर्दी होत आहे. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करत नागरिक खासगी वाहनातून पर्यटन स्थळे गाठत आहेत. पर्यटन नियोजनामुळे खासगी वाहनचालकांच्या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबीय पर्यटनाचा आनंद घेत आहेत. शासकीय नोकरदार, व्यवसायिक, मित्र परिवार, महिला, मुले सुट्टीच्या निमित्ताने एकत्र येऊन विरुंगुळासाठी विविध लहान मोठ्या पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी देऊन आनंद साजरा करीत आहेत. परिणामी सर्वच रस्त्यांवरचे दळणवळण वाढले आहे. धार्मिक व पर्यटन स्थळी खासगी वाहनाची रेलचेल आहे. सुट्टीमुळे अनेक जण सप्तशृंगी गड, सापुतारा, शिर्डी, शनिशिंगणापूर, पेरूची वाडी नाशिक, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, शेगाव, अक्कलकोट, पुणे, कोल्हापूर, पावागड, मांगीतुंगी, गणपती पुळे, अष्टविनायक, कोकण दर्शन आदी ठिकाणी पर्यटन स्थळाला भेटी देऊन देवदर्शन व पर्यटनाचा आनंद घेत आहेत. सुट्टीमुळे खासगी वाहने ९ ते १४ रुपये किलोमीटर दराप्रमाणे भाडे आकारीत आहेत. शहरातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने उपलब्ध करून दिली जात आहे. खासकरून क्रुझर, ईरटीका, तवेरा, इनोव्हा, मिनी व्हॅन आदी भाडेतत्त्वाच्या वाहनांना चांगली मागणी आहे. ----- दिवाळीच्या सुट्टीत नागरिक पर्यटन स्थळे, मंदिरे, गड, किल्ले यांना भेटी देत आहेत. वैयक्तिक संपर्कातून प्रवासी भाडे मिळत आहे. नागरिकांची खासगी वाहनांना जास्त पसंती मिळत आहे. दिवाळी सुट्ट्यांमुळे व्यवसाय वाढला आहे. - शंतनू पाकळे, खासगी वाहन चालक, मालेगाव ------ वाहनांचे प्रकार, दर किलोमीटरप्रमाणे कार : ११ रुपये क्रुझर : १६ ते १७ रुपये इर्टिका १४ रुपये तवेरा १५ ते १६ रुपये मिनी ट्रॅव्हल व्हॅन २५ ते २७ रुपये ईनोव्हा २० ते २२ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.