घर सजावटीसाठी ‘रेडीमेड’ साहित्याला पसंती

घर सजावटीसाठी ‘रेडीमेड’ साहित्याला पसंती
Published on: 
मेनफिचर ----------- (दोन कॉलम फोटो येणार आहे) ---------------- घर सजावटीसाठी ‘रेडीमेड’ साहित्याला पसंती ----------- तोरण, रांगोळी स्टिकर्स, फुलांच्या माळा अन् लाइटिंगने सजली बाजारपेठ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : दिवाळीचा सण जवळ आल्याने शहरातील बाजारपेठेत घर सजावटीच्या साहित्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. पारंपरिक सजावटीसोबतच यंदा रेडिमेड तोरण, रांगोळी स्टिकर्स, कृत्रिम फुलांच्या माळा, आकर्षक वॉल हँगिंग, इलेक्ट्रिक दिवे व विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. कमी वेळेत घराला आकर्षक रूप देता येत असल्याने नोकरदार वर्गासह तरुणाईचा कल तयार सजावटीच्या साहित्याकडे वाढला आहे. दिवाळीत घराची स्वच्छता, रंगरंगोटी व सजावट करण्याला विशेष महत्त्व असते. घराच्या प्रवेशद्वारापासून ते देवघरापर्यंत प्रत्येक ठिकाणी सजावटीचा साज चढविला जातो. मात्र, धावपळीच्या जीवनशैलीमुळे सजावटीसाठी अधिक वेळ देणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे कमी वेळेत सहजपणे लावता येणाऱ्या रेडिमेड वस्तूंची मागणी वाढत असल्याचे बाजारपेठेतील चित्र आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये विविध प्रकारचे साहित्य मांडण्यात आले असून, सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांकडून या वस्तूंची चौकशी केली जात आहे. ..... तोरणांचे विविध प्रकार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आकर्षक रूप देण्यासाठी रंगीबेरंगी तोरणांची खरेदी केली जात आहे. आंब्याची पाने, झेंडूची फुले व पारंपरिक मण्यांच्या तोरणांसोबतच कृत्रिम फुले, मोती, आरसे व सजावटीच्या मण्यांनी तयार केलेली तोरणे बाजारात उपलब्ध आहेत. १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत तोरण उपलब्ध आहेत. ...... रांगोळी स्टिकर्सचा पर्याय दिवाळीमध्ये अंगणात व प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढण्याची परंपरा आहे. मात्र, रांगोळी काढण्यासाठी वेळ व कौशल्याची गरज असल्याने रेडिमेड रांगोळी स्टिकर्सचा पर्याय लोकप्रिय होत आहे. विविध आकार, रंग व आकर्षक नक्षी असलेले स्टिकर्स बाजारात उपलब्ध आहेत. जमिनीवर सहज चिकटविता येणाऱ्या या स्टिकर्समुळे कमी वेळेत सजावट पूर्ण करता येते. बाजारात ३० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत हे स्टीकर उपलब्ध आहेत. ....... फुलांच्या माळा अन् लाइटिंगची सजावट घरातील दरवाजे, खिडक्या, देवघर व भिंती सजविण्यासाठी कृत्रिम फुलांच्या माळा, वेल, लटकन व सजावटीच्या फुलांचे गुच्छ खरेदी केले जात आहेत. नैसर्गिक फुलांच्या तुलनेत या माळा अधिक काळ वापरता येत असल्याने अनेक ग्राहक त्यांना पसंती देतात. यासोबतच एलईडी लाइटिंग, रंग बदलणाऱ्या विद्युत माळा, पडद्यांसारख्या लाइट्स व विविध आकारांतील सजावटीचे दिवे बाजारात दाखल झाले आहेत. ८० रुपयांपासून ते १,२०० रुपयांपर्यंत या माळा उपलब्ध आहेत. ...... कोट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घर सजावटीच्या रेडिमेड साहित्याला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. विशेषतः आकर्षक तोरण, रांगोळी स्टिकर्स, कृत्रिम फुलांच्या माळा व एलईडी लाइटिंगला मागणी आहे. कमी वेळेत घराची सजावट करता येत असल्याने नोकरदार महिला व तरुण ग्राहक या वस्तूंना प्राधान्य देतात. - किशोर सोनी, विक्रेता, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com