फोटो -NSK26H34738
नाशिक : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या शोरूममध्ये ग्राहकांची झालेली गर्दी.
आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये
वैविध्यपूर्ण दागिने उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.७ : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या संख्येने आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या शोरूममध्ये गर्दी केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शोरूममध्ये दाखल झालेली दागिन्यांची नवी व्हरायटी, आकर्षक डिझाईन्स आणि दागिन्यांचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांनी खरेदीला पसंती दिली.
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सकाळपासूनच ग्राहकांची ये-जा सुरू झाली होती. कुटुंबासह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे शोरूममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार दागिन्यांची माहिती देणे, विविध डिझाईन्स दाखवणे आणि खरेदीचा अनुभव अधिक सुखद करणे यासाठी आर. सी. बाफना ज्वेलर्सचा कर्मचारीवर्गही तत्परतेने कार्यरत होता. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच विविध प्रकारच्या दागिन्यांच्या खरेदीला मिळालेला प्रतिसादही लक्षवेधी ठरला.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांनी जपलेला विश्वास, दागिन्यांमधील सातत्याने वाढणारी विविधता आणि ग्राहकसेवेची परंपरा यामुळे आर. सी. बाफना ज्वेलर्सला धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना यांनी ग्राहकांचे आभार मानले व सुवर्ण प्रेमी ग्राहकांना शोरूमला भेट देण्याचे आवाहन केले.