सोमवारचा कॉलम निमित्त

सोमवारचा कॉलम निमित्त
Published on: 
ॲंकर टुडे पान एकसाठी ----------- लोगो : निमित्त/सचिन जोशी ------- NSK26H34739 ------- शीर्षक... ‘चलो जलाएं दीप वहॉं जहॉं अभी भी अंधेरा है..!’ ----------- इंट्रो.. प्रकाशाचे मंगल पर्व म्हणून दीपोत्सव जगभरात साजरा केला जातो. सध्याचे दिवस या उत्सवाचे आहेत. वसुबारसपासून सुरवात होऊन भाऊबीजेपर्यंत चालणारा हा सण. प्रचंड उत्साह, चैतन्य व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे हे पर्व.. नव्या वस्तू, कपडे खरेदीसह बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल करणारा हा उत्सव. अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा संदेश देत सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा हा सण म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवाळी सण साजरा करताना दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला व पाणीटंचाईच्या तीव्र समस्येची जाणीव ठेवावी, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही... ---- भारतीय अर्थव्यवस्था बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हाती पैसा असला तर बाजारपेठेतील उलाढाल चांगली होते, हा आजवरचा अनुभव. भारतीय परंपरेत मॉन्सूनचे आगमन, शेतकऱ्यांच्या त्यादृष्टीने मशागतीसह उत्पादन घेण्याच्या नियोजनावरच सणोत्सवांचे वेळापत्रक ठरलेले असते, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. मॉन्सूनच्या पावसावर खरीप हंगाम घेतला जातो. या हंगामातील उत्पन्न साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्याच्या हाती येते. तेव्हापासून नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणोत्सवांचे दिवस असतात. शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे आल्यानंतर बाजारपेठेत हालचाली सुरू होतात. दिवाळी सणात केवळ शेतकरीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक वर्ग आपापल्या परीने वेगवेगळ्या वस्तू, उपकरणं, वाहनं, घरे, फ्लॅट आदींची खरेदी करीत असतो. ही सर्व उलाढाल होत असताना मूळ केंद्रबिंदू मात्र, शेतकरी असतो. कारण, शेतकऱ्याच्या हाती पैसा आल्याशिवाय तो बाजारात फिरत नाही. यंदा दिवाळीच्या या उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्रातील स्थिती पाहिली तर जवळपास सरासरी २५ ते ३० टक्के पावसाची तूट आहे. पावसाचे दिवसही अगदी बोटावर मोजण्याइतकेच होते, त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिकच जाणवतेय. १९७२च्या दुष्काळाची आठवण करून देणारे हे चित्र. शासनाने दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शासकीय दृष्टीकोनातून धोरण जाहीर करीत उपाययोजना लागू केल्या आहेत. शेतकऱ्यांना मदतीचे राज्य व केंद्र सरकारचे धोरण दिसते, पण तेवढ्या मदतीने काहीच भागणार नाही, अशी अवस्था. या स्थितीतही वर्षभरातून एकदा संस्कृती व परंपरेचे प्रतीक म्हणून येणारा दीपोत्सव पदरमोड करुन साजरा करण्याची शेतकऱ्याची तयारी असते, तसा तो यावेळीही हा सण त्याच्या परीने साजरा करतोय. वाढलेल्या शहरांच्या झगमगाटात प्रत्येकानेच जगाच्या पोशिंद्याचा म्हणजेच, बळीराजाचा विचार करुनच हा उत्सव साजरा करायला हवा. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असे म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले असताना आपण उधळपट्टी, मस्ती करणे योग्य नाही. दुष्काळाच्या तीव्रतेचा परिणाम बाजारपेठेवर दिसतोय. पण, ज्यांच्या घरी खाण्यालाही तेल-तूप, मिठाई नाही अशा उपेक्षित, वंचित घटकांच्या अंगणात दिव्यात तेल घालून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याची समाजातील घटक म्हणून आपली जबाबदारी आहे. जळगाव शहर व एकूणच जिल्हा सामाजिक जाणिवेसाठी ओळखला जातो, त्यामुळे इथले अनेक लोक, सामाजिक संस्था आपापल्या परीने हे कार्य करीत असतातच. म्हणूनच, या चैतन्यपर्वाच्या निमित्ताने ‘चलो जलाएं दीप वहॉं जहॉं अभी भी अंधेरा है..’ असे सांगावेसे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.