धुळे ः टुडे १ साठी, ॲंकरच्या शेजारी...........जागेच्या उपलब्धतेनुसार घ्यावे किंवा शिल्लक ठेवावी
---
जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाची
‘ओपीडी’ ११ नोव्हेंबरला बंद
--
दिवाळीमुळे बदल : ९ व १० ला सेवा सुरू
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सोमवारी (ता. ९) आणि मंगळवारी (ता. १०) सुरू राहणार आहे. मात्र, बुधवारी (ता. ११) भाऊबीजनिमित्त शासकीय सुटी असल्याने बाह्यरुग्ण विभाग पूर्णवेळ बंद राहील.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्णालयातर्फे ‘ओपीडी’च्या वेळापत्रकात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबरला दिवाळी उत्सवानिमित्त जिल्हाधिकारी घोषित सुटी आणि १० नोव्हेंबरला बलिप्रतिपदा तथा दिवाळी पाडव्याची शासकीय सुटी असली तरी या दोन्ही दिवशी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेत सुरू राहणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, रुग्णांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. उपचारासाठी रुग्णालयात येताना नागरिकांनी याच वेळापत्रकानुसार यावे, असे आवाहन सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकर्रम गुलाम खान यांनी पत्रकाद्वारे केले आहे.