व्हॅक्यूम क्लिनरच्या युगातही केरसुणीचा सुगंध कायम

व्हॅक्यूम क्लिनरच्या युगातही केरसुणीचा सुगंध कायम
Published on: 
मेनफिचर लोगो : दीपोत्सव... --------------- NSK26H34286 जळगाव : दिवाळीनिमित्त बाजारात केरसुणी विक्रीसाठी बसलेल्या कांताबाई बिऱ्हाडे. ----------------- व्हॅक्यूम क्लिनरच्या युगातही केरसुणीचा सुगंध कायम ------- हाताच्या बोटांनी विणलेली परंपरा; एक नग बनविण्यासाठी तासभर मेहनत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२ : काळ बदलला... घरातील साफसफाईची साधनेही बदलली... हातातील झाडूची जागा आता आधुनिक उपकरणांनी घेतली. मोठ्या घरांमध्ये व्हॅक्यूम क्लिनर दिसू लागले, तर बाजारात आकर्षक रंगांचे आधुनिक झाडू आलेत. मात्र, सणोत्सव असो किंवा लग्नसराई, पारंपरिक केरसुणीचे महत्त्व आजही कायम आहे. विशेष म्हणजे, ही केरसुणी केवळ घरातील केरकचरा साफ करीत नाही, तर ती तयार करणाऱ्या कष्टकरी हातांच्या संसारालाही आधार देते. मात्र, या हातांच्या वाट्याला आता संघर्षच अधिक येत आहे. येथील केरसूणी विक्रेत्या कांताबाई बिऱ्हाडे यांनी सांगितले की, बाजारात ५० ते ६० रुपयांना विकली जाणारी एक केरसुणी तयार करण्यासाठी साधारण आम्हाला तासभर मेहनत घ्यावी लागते. पन्हाया झाडाची साल गोळा करायची, तिची निवड करायची व एकेक काडी हाताने व्यवस्थित बांधून केरसुणीचा आकार द्यायचा. ही प्रक्रिया दिसायला साधी असली, तरी त्यामागे कौशल्य, संयम व मेहनत दडलेली आहे. आम्हाला दिवसभर कष्ट करून तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी बाजारात जागा शोधावी लागते. कधी ग्राहकांची वाट पाहावी लागते, तर कधी विक्री न झालेला माल घेऊन घरी परतावे लागते. आमच्यासाठी हा केवळ व्यवसाय नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली परंपरा आहे. केरसुणीसोबतच आम्ही झाडू, सूप व लग्नसराईत लागणारे तुरीचे मंडप तयार करतात. लग्नाचा हंगाम सुरू झाला की, कामाची आशा निर्माण होते. ....... मेहनत आमची, पण बाजारपेठ दुसऱ्यांची आपल्या मनातील खंत व्यक्त करताना कांताबाई सांगतात की, आम्ही हाताने वस्तू तयार करतो. एका केरसुणीसाठी तासभर मेहनत घ्यावी लागते. मात्र, आता इतर लोकही हा व्यवसाय करू लागल्याने स्पर्धा वाढली आहे. आमच्या समाजातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे. आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक असताना विक्रीसाठी जागाही मिळत नाही. मेहनत करूनही अपेक्षित पैसे मिळत नाहीत. मुलाबाळांचे शिक्षण, घरखर्च व रोजच्या गरजा भागविताना मोठी कसरत करावी लागते. ........ परंपरेच्या हातांना आधाराची गरज आजच्या आधुनिक युगात पारंपरिक वस्तूंची मागणी कमी-जास्त होत असली, तरी सणोत्सव व लग्नसराईत त्यांचे महत्त्व कायम आहे. विशेषतः मातंग समाजातील अनेक कुटुंबांनी अशा पारंपरिक व्यवसायांच्या माध्यमातून आपली उपजीविका जपली आहे. मात्र, बदलत्या बाजारपेठेत त्यांना टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ....... कोट पूर्वी आमच्या समाजातील अनेक कुटुंबे केरसुणी, झाडू, सूप व लग्नसराईसाठी लागणाऱ्या पारंपरिक वस्तू तयार करून उदरनिर्वाह करायची. आजही आम्ही हाताने या वस्तू तयार करतो. आता इतर लोकही या व्यवसायात उतरल्याने स्पर्धा वाढली आहे. आर्थिक अडचणींमुळे संसार चालविणे कठीण झाले आहे. - कांताबाई बिऱ्हाडे, विक्रेता, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.