द्राक्षनगरीत दीपउत्सवाने चैतन्याचे वातावरण

द्राक्षनगरीत दीपउत्सवाने चैतन्याचे वातावरण
Published on: 
फोटो PML26B10319 पिंपळगाव बसवंत ः दीपोत्सवासाठी सुरू असलेली खरेदी. --- पिंपळगावच्या बाजारपेठेत सात कोटींची उलाढाल लक्ष्मीपूजनानिमित्त खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; कपडे, सोने, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन खरेदीला पसंती पिंपळगाव बसवंत, ता. ८ : दीपावलीच्या स्नेह आणि प्रकाशपर्वाने द्राक्षनगरी उजळून निघाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शहरात उत्साहाचे वातावरण असून, गेल्या तीन दिवसांत कपडे, सुवर्णालंकार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांच्या खरेदीतून सात कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. समृद्धी देणाऱ्या दीपोतस्वाने उत्साह अन् चैतन्याचे वातावरण पिंपळगाव शहरात पसरले आहे. निफाड फाटा परिसरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली दिवाळीची लगबग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिगेला पोहोचली. आकर्षक आकाशकंदील आणि विद्युत रोषणाईने घरे व व्यावसायिक प्रतिष्ठाने उजळून निघाली. झेंडूची फुले, पूजेचे साहित्य आणि मिठाई खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नवीन घर खरेदीसाठीही नागरिकांनी पसंती दिली. अनेक कुटुंबांनी स्वप्नातील घराचे बुकिंग केले. घराघरांत तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांत लक्ष्मीपूजन पारंपरिक उत्साहात करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने शहरात दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दोन दिवस अद्याप शिल्लक असल्याने बाजारपेठेतील उलाढाल आणखी वाढण्याची अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. सात कोटींच्या उलाढालीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.