Diwali Traffic
sakal
नाशिक: दिवाळीनिमित्त शहरातील विविध आस्थापनांनी यंदा भरघोस बोनस दिल्याने खरेदीदारांचा उत्साह दिवाळीच्या तिसऱ्या दिवशीही खरेदीदारांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. दिवाळी खरेदीसाठी नाशिककर मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरल्याने शहरातील सर्वच प्रमुक चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यातच पोलिस प्रशासनाने बाजारपेठेत वाहने न आणण्याचे आवाहन करूनही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोंडीत भरच पडत गेली.