Diwali Festival: दिवाळीचा फराळ यंदाही महागलेलाच! कच्च्या मालाचे भाव वाढल्याने खर्चाचे फटाके फुटणार

Diwali Faral
Diwali FaralSakal

Diwali Festival : दिवाळीचा सण म्हटला, की फटाक्यांची आतषबाजी अन् फराळाच्या लज्जतदार पदार्थांचा आनंद. यंदा फराळ बनवताना महागाईमुळे सामान्यांकडे खर्चाचे फटाके फुटणार आहेत.

कच्च्या मालाचे भाव वधारलेलेच असल्याने या फराळाचा गोडवा काहीसा कमी झाला आहे. (Diwali snacks expensive this year price of raw material increases expenditure will explode nashik)

दिवाळीचा फराळ घरोघरी बनविला जातो. यात शंकरपाळे, करंजी, चकली, अनारसे, लाडू, शेव, चिवडा अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो. यासाठी तेल, तूप, गूळ, साखर, रवा, डाळी, शेंगदाणे, पोहे यांसारखे प्रमुख जिन्नस लागतात.

मात्र या जिन्नसांचे बाजारात भाव वधारलेले असल्याने यंदा फराळ बनवताना सामन्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. काही लोक घरी फराळ बनवतात, तर काही लोक मार्केटमधून फराळ विकत आणतात.

जिन्नसांच्या वाढलेल्या किमतींमुळे आयत्या फराळाला भाववाढीने घेरले आहे. तसेच फराळ बनवून देणाऱ्या कारागिरांनी देखील मजुरीत वाढ केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही फराळ महागलेला असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत.

"दिवाळीला फराळ घरी करायचा किंवा आयता आणायचा जरी ठरवले तरी खर्चाचे गणित हे या महागाईमुळे बिघडूनच जाते."- भक्ती निरंतर, नाशिक

"सगळीकडे भाववाढ झालेली आहे. गृहिणींनी फराळ कसा करावा. ऐन सणासुदीतसुद्धा काटकसर करावे लागते आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे."

- रचना चिंतावार, नाशिक

"प्रत्येक दिवाळीला महागाई वाढत जाते. त्यामुळे ठरविल्याप्रमाणे फराळाचे सर्व पदार्थ बनवता येत नाहीत. आर्थिक नियोजनानुसार शक्य होईल तसा फराळ बनवून समाधान मानावे लागत."

- शीतल भावसार, ओझर

Diwali Faral
Diwali Padwa 2023 : दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून

तयार फराळाच्या गेल्या वर्षी अन् यंदाच्या किमती (प्रतिकिलो) : २०२२ २०२३

शंकरपाळे - २०० ते ३५० ३०० ते ४००

करंजी - ४०० ते ५०० ५०० ते ७००

अनारसे - ४०० ते ५०० ५५० ते ७००

चिवडा - २५० ते ३०० ३०० ते ३५०

ड्रायफ्रूट चिवडा - ५०० ते ५५० ५५० ते ६००

शेव/पापडी - २०० ते २५० २५० ते ४००

चकली - २५० ते ३५० ३०० ते ४००

लाडू (रवा) - ३५० ते ५०० ४५० ते ७००

लाडू (बेसन) - ३०० ते ५०० ३५० ते ७००

फराळ बनविणाऱ्या कारागिरांची मजुरी (प्रतिकिलो) : २०२२ २०२३

नमकीन - ८० ते १०० १०० ते १२०

गोड पदार्थ - १०० ते १२० १२० ते १८०

Diwali Faral
Diwali 2023: लक्ष्मी पूजनसाठी वेगळा लूक हवाय? हे इअर रिंग्स नक्की ट्राय करुन पाहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com