सेकंड मेन
NSK26H34159
जळगाव : दिवाळी फराळ बनवून घेताना महिला.
------------
NSK26H34161
दिवाळीसाठी पापडी बनवताना महाराज.
---
दिवाळी फराळाचा खमंग दरवळ; चौकाचौकात स्टॉल्स
तयार फराळाला पसंती; मजुरी देऊन घरगुती फराळ बनविण्याकडेही कल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : दिवाळीच्या सणानिमित्त शहरात चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू अशा पारंपरिक फराळाच्या पदार्थांचा खमंग दरवळ पसरू लागला आहे. बाजारपेठेत केटरर्स आणि फराळ विक्रेत्यांची दुकाने सजली असून, तयार फराळ खरेदी करण्यासोबतच मजुरी देऊन घरगुती फराळ बनवून घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. घरात स्वतः फराळ तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचवून अधिक प्रमाणात फराळ बनविण्याचा पर्याय अनेक कुटुंबांकडून निवडला जात आहे.
फराळ बनविण्यासाठी साधारणतः १२५ रुपये किलो प्रमाणे मजुरी आकारली जात आहे, तर गोड पदार्थ बनविण्यासाठी २०० रुपये प्रमाणे मजुरी घेतली जात आहे. या पर्यायामुळे घरातील साहित्याचा वापर करून आवश्यकतेनुसार फराळ तयार करून घेणे नागरिकांना शक्य होत आहे.
कमी श्रमात अधिक फराळ
चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू यांसारखे विविध पदार्थ बनविण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे सर्व पदार्थ स्वतः बनविण्याऐवजी काही पदार्थ तयार विकत घेणे, तर काही पदार्थ मजुरी देऊन बनवून घेणे, असा पर्यायही नागरिकांकडून स्वीकारला जात आहे. घरगुती चव आणि आवश्यकतेनुसार पदार्थांचे प्रमाण राखता येत असल्याने या पद्धतीला पसंती मिळत आहे.
तयार फराळाचीही मागणी
बाजारपेठेतील फराळ विक्रेत्यांकडे तयार पदार्थांसह विविध प्रकारची पॅकेट उपलब्ध आहेत. चवीतील वैविध्य, वेळेची बचत आणि सोयीमुळे तयार फराळ खरेदीलाही मागणी आहे. दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी फराळ खरेदी आणि बनवून घेण्याच्या कामांना वेग येत आहे.
चौकट
- तिखट फराळ व इतर पदार्थ : १२५ रुपये प्रमाणे मजुरी
- गोड पदार्थ : २०० रुपये प्रमाणे मजुरी
- नागरिकांचा कल : कमी श्रमात अधिक फराळ तयार करून घेण्याला पसंती
- प्रमुख पदार्थ : चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, करंजी, लाडू
कोट
दिवाळीच्या काळात घरगुती फराळ बनवून घेण्यासाठी नागरिकांकडून चांगली मागणी होत आहे. नोकरी आणि व्यवसायामुळे अनेकांना घरी फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे नागरिक साहित्य उपलब्ध करून देतात आणि आम्ही मजुरी घेऊन फराळ तयार करून देतो.
-जसराज महाराज,
व्यावसायिक